शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

एसटीचे प्रवासी पळविणारे हॉटलिस्टवर

By admin | Updated: December 22, 2015 01:01 IST

परिवहन महामंडळाची मोहीम : बसस्थानक परिसरात ४० दिवसांत अवैध वाहतूक करणाऱ्या २१ हजार नोंदी

प्रदीप शिंदे-कोल्हापूर -जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसना स्थानकाच्या परिसरातून होणाऱ्या अवैध खासगी प्रवासी वाहतुकीचा मोठा फटका बसत आहे. यावर कारवाई करण्यासाठी एस.टी. महामंडळ, प्रादेशिक परिवहन कार्यालय व स्थानिक पोलीस प्रशासनाच्यावतीने उघडलेल्या मोहिमेंतर्गत गेल्या ४० दिवसांत जिल्ह्यातील १२ बसस्थानकांतील २०० मीटरच्या आत नो पार्किंग झोनमधून खासगी प्रवासी अवैध वाहतूक करणाऱ्या २१,५७६ वाहनांच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात विनापरवाना प्रवासी वाहतूक करण्यास निर्बंध आहेत. तरीही अनेक खासगी बसेस, जीप, मेटॅडोअर, टुरिस्ट वाहने बिनदिक्कत प्रवासी वाहतूक करीत आहेत. त्यामुळे सामाजिक बांधीलकी जपत प्रवाशांच्या सेवेसाठी प्रसंगी तोटा सहन करून केवळ बोटांवर मोजता येतील इतक्या प्रवाशांना घेऊन वाहतूक करणाऱ्या एस.टी.चे कंबरडे मोडले आहे. याला अटकाव करण्यासाठी तसेच नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी एस.टी. महामंडळ, प्रादेशिक परिवहन कार्यालय व संबंधित स्थानकांतील स्थानिक पोलीस प्रशासन यांच्यावतीने कडक पावले उचलण्यात आली आहेत. त्यानुसार महामंडळाच्यावतीने दिवसात तीन टप्प्यांत २०० मीटरच्या आत अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांची नोंद केली जात आहे. यावेळी संबंधित वाहनाचा प्रकार, नंबर यांची सविस्तर माहिती घेतली जात असून, महामंडळाच्यावतीने माहितीची एक प्रत परिवहन विभाग, शहर वाहतूक शाखा, स्थानिक पोलीस ठाण्यांसह राज्य परिवहनच्या मुंबई कार्यालयास पाठविली जात आहे. ६ नोव्हेंबरला या मोहिमेची सुरुवात झाली असून, १६ डिसेंबरपर्यंत ४० दिवसांत राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागातील १२ आगारांतील २०० मीटर नो पार्किंग झोनमधून २१,५७६ खासगी वाहनांनी अवैध वाहतूक केली आहे. प्रशासनाच्यावतीने ही वाहतूक रोखून संबंधितांवर कडक कारवाई केल्यास महामंडळाच्या उत्पन्नात नक्कीच वाढ होणार आहे. राधानगरी सुपर फास्ट...१२ आगारांतील ४० दिवसांच्या तपासणीमध्ये राधानगरी आगारात सर्वांत जास्त अवैध प्रवासी वाहतूक झाल्याचे निदर्शनास आले आहे. येथे ३,८४४ अवैध वाहनांतून प्रवासी वाहतूक झाली. यामध्ये २,८३१ जीपमधून वाहतूक झाली आहे. त्यापाठोपाठ कागल आगाराचा क्रमांक येतो. कागलमधून ३,३४८ वाहनांनी अवैध प्रवासी वाहतूक केली आहे. येथून २,३९५ रिक्षांमधून वाहतूक झाली आहे. अशी आहेत १२ आगारांतील वाहने जीप१०,५९६मेटॅडोअर१००रिक्षा७,५८६टुरिस्ट वाहने७०५इतर वाहने२,५८९ एकूण२१५७६या आगारांत केली तपासणी...कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक परिसर, संभाजीनगर, इचलकरंजी, गडहिंग्लज, गारगोटी, मलकापूर, चंदगड, कुरुंदवाड, कागल, राधानगरी, गगनबावडा, आजरा.