गडहिंग्लज : घर बांधण्यासाठी सुलभ अर्थसाहाय्य उपलब्ध करण्याबरोबरच कर्जाची परतफेड वेळेत करणे आणि गुंतवणुकीविषयी योग्य मार्गदर्शन करणाऱ्या रवळनाथ हौसिंग फायनान्स सोसायटीमुळेच सुशिक्षितांमध्येही आर्थिक साक्षरतेचा प्रसार होत आहे, असे गौरवोद्गार प्राचार्य एस. एन. देसाई यांनी काढले.
श्री रवळनाथ हौसिंग फायनान्स सोसायटी व झेप अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘रवळनाथ’च्या नूतन संचालक व मान्यवरांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले होते.
याप्रसंगी संस्थापक चौगुले यांच्यासह प्रा. दत्ता पाटील, महेश मजती, प्राचार्य डॉ. रामचंद्र निळपणकर, प्रा. मनोहर पुजारी, प्राचार्या मीना रिंगणे, उमा तोरगल्ली, तर गडहिंग्लज हायस्कूलच्या प्राचार्यपदी निवड झाल्याबद्दल एस. एन. देसाई यांचा त्यांच्या पत्नी संगीता यांचा सत्कार झाला. यावेळी रेखा पोतदार, निळपणकर यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास संस्थेचे सीईओ दत्तात्रय मायदेव, डॉ. बी. एस. पाटील, प्रदीप अभ्यंकर, आप्पासाहेब आरबोळे, महादेव पाटील, रशीदा शेख, बसवराज रिंगणे, बाबासाहेब मार्तंड, आदी उपस्थित होते. दत्ता पाटील यांनी स्वागत केले. प्रशासन अधिकारी सागर माने यांनी सूत्रसंचालन केले. संदीप कागवाडे यांनी आभार मानले.
---------------------------------------
* ज्ञानदीप संस्थेला सहा लाखांची देणगी गडहिंग्लज विभागातील ग्रामीण भागातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी झेप अकॅडमी व ज्ञानदीप संस्थेतर्फे राबविल्या जाणाऱ्या सामाजिक उपक्रमासाठी प्राचार्य देसाई, प्रा. विजयकुमार घुगरे, रेखा शंकरराव पोतदार यांनी प्रत्येकी दोन लाख असे सहा लाखांची देणगी दिली. त्याबद्दल त्यांचाही सत्कार झाला.
---------------------------------------
फोटो ओळी : गडहिंग्लज येथे प्राचार्य एस. एन. देसाई यांचा ‘रवळनाथ’चे संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले, तर संगीता देसाई यांचा मीना रिंगणे यांनी सत्कार केला. यावेळी दत्ता पाटील, बी. एस. पाटील, संदीप कागवाडे, महेश मजती, आदींसह संचालक उपस्थित होते.
क्रमांक : ०३०१२०२१-गड-०३