शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

‘स्मार्ट कार्ड’साठी ज्येष्ठांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 23:48 IST

कोल्हापूर : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून सवलतीच्या दरात प्रवास करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना ‘स्मार्ट कार्ड’ घेणे अनिवार्य आहे. १ ...

कोल्हापूर : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून सवलतीच्या दरात प्रवास करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना ‘स्मार्ट कार्ड’ घेणे अनिवार्य आहे. १ जानेवारीनंतर ज्या ज्येष्ठांकडे स्मार्ट कार्ड नाही त्यांना सवलतीचा लाभ मिळणार नसल्याने स्मार्ट कार्ड काढून घेण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. ज्येष्ठांची गर्दी लक्षात घेता काही खासगी केंद्रांतून ज्येष्ठांकडून वीस ते पन्नास रुपये जादा आकारले जात आहेत.राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून सवलतीच्या दरात प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना कागदी पासऐवजी महामंडळाकडून बँक व आधार क्रमांकाशी जोडलेले अत्याधुनिक ‘स्मार्ट कार्ड’ दिले जात आहे. महामंडळाच्या सर्व आगारांसह काही खासगी केंद्रांमार्फतही ज्येष्ठांना हे कार्ड तयार करून दिले जाते.एक जानेवारीनंतर ज्येष्ठांना एस.टी. बसमधून प्रवास करताना स्मार्ट कार्ड नसेल तर सवलतीचा लाभ मिळणार नाही. स्मार्ट कार्ड काढून घेण्याची प्रक्रिया एक जानेवारीनंतरही चालू राहणार आहे. मात्र, याबाबत गैरसमज पसरवून ३१ डिसेंबरपर्यंत स्मार्टकार्ड मिळेल असा प्रचार केला जात असल्याने, ज्येष्ठांची स्मार्ट कार्ड काढून घेण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. मध्यवर्ती बसस्थानक येथे स्मार्ट कार्ड घेण्यासाठी एकच केंद्र सुरूआहे. या ठिकाणी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग यासह कामगार, आदी सवलतधारकांचीही पास काढण्यासाठी गर्दी होत आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी हेळसांड होत आहे. अनेकांना ताटकळत बसावे लागत आहे. त्यासाठी आणखी एक खिडकी सुरू करावी, अशी मागणी होत आहे.खासगी केंद्रांवरजादा आकारणीज्येष्ठ नागरिकांचे सवलती पास काढण्यासाठी फक्त ५५ रुपये इतके शुल्क आहे. मात्र, काही खासगी केंद्रांवर जलद काढून देण्याचे कारण पुढे करून ज्येष्ठांकडून ७० ते १०० रुपये घेतले जात आहेत.