शहरं
Join us  
Trending Stories
1
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
2
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
3
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
4
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
5
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
6
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
7
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
9
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
10
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
11
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
12
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
13
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
14
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
15
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
16
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
17
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
18
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
19
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका
20
पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह

जागेअभावी २१ गावांमध्ये स्माशनभूमीच नाही

By admin | Updated: April 19, 2017 00:57 IST

जिल्ह्यातील चित्र : मंजूर निधीही रद्द करण्याची नामुष्की; दानशूरांच्या पुढाकाराची गरज

समीर देशपांडे --कोल्हापूर --गेल्या पाच वर्षांमध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेने स्मशानशेड बांधणीकडे विशेष लक्ष दिले आहे. त्यासाठी मोठा निधीही जाणीवपूर्वक उपलब्ध करून देण्यात आला. मात्र, २१ गावांमध्ये स्मशानासाठी जागाच उपलब्ध नसल्याने या ठिकाणी अनेक वेळा मंजूर झालेला निधीही रद्द करावा लागला आहे. गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यातील एक ही गाव स्मशानशेडशिवाय राहू नये, यासाठी जिल्हा परिषदेने नियोजन केले. प्रतिवर्षी निधीही दिला; परंतु १०३० ग्रामपंचायतींच्या गावांपैकी २१ गावांमध्ये स्मशानभूमीच नाही. काही ठिकाणी जागा उपलब्ध आहे परंतु तेथे वाद आहे. मात्र, २१ गावांमध्ये जागाच नसल्याने एकीकडे तिथल्या ग्रामस्थांची कुचंबणा होतच आहे. दुसरीकडे जिल्हा परिषदेकडे निधी असतानाही जागा नसल्याने तो खर्च करत येत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्या २१ गावांमध्ये सार्वजनिक जागा उपलब्ध नाही. त्यातील काही गावांना गायरानच शिल्लक नाही. परिणामी स्मशानभूमीच नाही. बहुतांशी ग्रामस्थांची स्वत:ची शेती असल्याने आपापल्या शेतामध्ये अंत्यसंस्कार करण्याला प्राधान्य दिले जाते; परंतु ज्यांची शेती नाही त्यांची मात्र पंचाईत होते. अखेर भाऊबंदातील कुणाची तरी जमीन असेल तर तेथे अंत्यसंस्कार करण्यात येतात. स्मशानासाठी दोन-तीन गुंठ्यांची जागा आवश्यक असते. मात्र, आपल्या शेतातील जागा देण्यासाठी ग्रामस्थ तयार होत नाहीत. रोज उठून आपल्या शेतात अंत्यसंस्कार नकोत, अशी त्यामागची भूमिका असते. त्यामुळे या कामासाठी जागा देण्यासाठी शेतकरीही तयार होत नाहीत. त्यामुळे ही २१ गावे स्माशनभूमीशिवाय राहिली आहेत. एकदा का जागा मिळाली की लगेच तिथे स्मशानशेड मंजूर करण्यात येते. तसेच संरक्षक भिंतीसाठीही निधी दिला जातो. सुधारित शवदाहिन्यांचाही पुरवठा होतो.चार कोटी ७० लाखांची कामेगेल्यावर्षी जिल्हा परिषदेने मोठी रक्कम स्मशानशेड बांधण्यावर खर्च करण्याचे नियोजन केले होते. १०० गावांत शेड बांधण्यासाठी साडेतीन कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली, तर मोठ्या आठ गावांमध्ये प्रत्येकी १५ लाख, असे एक कोटी २० लाख रुपये मंजूर केले होते. स्मशानभूमी नसलेली गावेतालुकागावाचे नावआजराचिमणेचंदगडकरंजगावचंदगडबसर्गेगडहिंग्लजबिदे्रवाडीगडहिंग्लजदुगुनवाडीगडहिंग्लजजांभूळवाडीगडहिंग्लजशिप्पूर तर्फ आजरागडहिंग्लजतेगीनहाळकरवीरआंबेवाडीपन्हाळाबोंगेवाडीपन्हाळावेखंडवाडीपन्हाळाकोदवडेपन्हाळापणोरेपन्हाळावाळवेकरवाडीपन्हाळाअमृतनगरराधानगरीबरगेवाडीराधानगरीफराळेराधानगरीकेळोशी बु.शाहूवाडीअमेणीशिरोळसंभाजीपूरशिरोळघालवाड