शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

बालकांना डोस देऊन पालकांची लुबाडणूक

By admin | Updated: December 12, 2014 23:34 IST

डॉक्टरांची मदत : सोलापुरातील संस्था

आळसंद : खानापूर तालुक्यासह आळसंद परिसरात ० ते १५ वर्षांच्या आतील मुलांना आयुर्वेदिक सुवर्णप्राश स्मरणशक्ती व बुध्दिवर्धक टॉनिक देण्याच्या नावाखाली सोलापूर येथील एका सेवाभावी संस्थेने लोकांची लुबाडणूक करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या सेवाभावी संस्थेने ग्रामीण भागात एजंटांना कामाला लावून नोंदणी करण्यास सुरूवात केली असून शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून स्थानिक डॉक्टरांना हाताशी धरून या संस्थेने हा उद्योग सुरू केला आहे.खानापूर तालुक्यातील आळसंद परिसरात काही तरूणांना ग्रामीण भागात पाठवून नोंदणी करण्याचे काम सुरू केले आहे. बुधवारी २० रूपये नोंदणी शुल्क आकारून गुरूवारी बालकांना प्रत्येकी १३० रूपये घेऊन डोस देण्यात आले. या डोसच्या शिबिरासाठी संस्थेने गुरुपुष्यामृताचा मुहूर्त काढला आहे. याचा उल्लेख नोंदणी कार्डावर करण्यात आला आहे. या शिबिराची कल्पना तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्यानंतर डॉ. लोखंडे यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांचे एक पथक आळसंद येथे चौकशीसाठी पाठविले. त्यावेळी आळसंद येथील एका स्थानिक डॉक्टरच्या रुग्णालयात हा डोस देण्यात येणार होता, असे समजले. त्या रुग्णालयात पथक गेले असता, त्या ठिकाणी संबंधित संस्थेचे कोणीही कर्मचारी अथवा संस्थेचे डॉक्टर नव्हते. त्यामुळे पथक परत आले. त्यानंतर संस्थेशी संपर्क साधला असता संस्थेच्या प्रमुखांनी, आम्ही आरोग्य विभागाशी चर्चा केल्याचे सांगितले. आरोग्य विभागाने काहीही चर्चा झाली नसल्याचे सांगितले. या संस्थेच्या भूमिकेबद्दल उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे.बुध्द्यांक वाढत असल्याचे भासवून सोलापुरातील संस्थेकडून डोस देण्यात येत आहेत. याची आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाला कोणतीही कल्पना नसल्याचे चौकशीनुसार स्पष्ट झाले. मात्र संबंधित संस्थेचे प्रतिनिधी मात्रा प्रशासनाशी चर्चा करूनच आम्ही डोस देत असल्याची खोटी माहिती जनतेला देत आहेत. याची चौकशी होण्याची गरज आहे. (वार्ताहर)गुरुपुष्यामृताचा मुहूर्त नोंदणी कार्डावर बालकाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवून त्याच्या बुध्दिमत्तेचा विकास होण्यासाठी बालकास गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर सुवर्णप्राश डोस अवश्य घ्या, अशी टीप नमूद केली आहे. मात्र, काल, गुरूवारी गुरूपुष्यामृत नसतानाही बालकांना डोस देण्यात आले. त्यामुळे संस्थेने गुरूपुष्यामृताचा मुहूर्त का नमूद केला, याची चर्चा परिसरात सुरू होती.