शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

विशेष बंदोबस्ताची आखणी

By admin | Updated: August 25, 2016 00:38 IST

पोलिसांची कठोर भूमिका : डॉल्बी लावणाऱ्यांवर तत्काळ कारवाई

एकनाथ पाटील -- कोल्हापूर --कोल्हापूरकरांचा नागरी उत्सव ठरणाऱ्या गणेशोत्सवातील बंदोबस्तासाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. गतवर्षी डॉल्बी लावणार नाही, असे म्हणणारेच डॉल्बी लावून पुढे येतात. त्यामुळे यंदाच्या वर्षी डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी वेळप्रसंगी कठोर भूमिका घेण्याच्या सूचना पोलिस निरीक्षकांना दिल्या आहेत. उत्सवकाळात रस्त्यावरील वाहतूक कोंडी, अनुचित प्रकार टाळण्यासाठी विशेष बंदोबस्ताची आखणी केली आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. कोल्हापूर अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर आहे; त्यामुळे सणासुदीच्या काळात विशेषत: गणेशोत्सव व नवरात्रकाळात पोलिस अधिक दक्ष असतात. यंदाचा गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडावा, यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. कोल्हापूर शहरात गेल्या वर्षी बाराशेहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे होती, तर अडीच लाखांहून घरगुती गणपती होते. यंदा त्यामध्ये काही प्रमाणात वाढ झाली आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या धर्तीवर पोलिस अधीक्षक देशपांडे यांनी जिल्'ाचा आढावा घेतला. शहरातील प्रमुख मार्गांची ते स्वत: पाहणी करणार आहेत. डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी वेळप्रसंगी कठोर भूमिका घेण्याच्या सूचना त्यांनी निरीक्षकांना केल्या आहेत. गोपाळकाला व गणेशोत्सवात शहरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यासाठी संपूर्ण पोलिस दल रस्त्यांवर उतरणार असल्याचे पोलिस अधीक्षक देशपांडे यांनी सांगितले. फेरीवालामुक्त परिसरगणेशोत्सवात मोठ्या संख्येने भाविक रस्त्यांवर उतरत असतात. प्रसिद्ध सार्वजनिक मंडळांच्या ठिकाणी लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात. अशा ठिकाणी पदपथावरील फेरीवाल्यांचा मोठा अडसर असतो. त्यासाठी पोलिसांनी फेरीवाला पथक तयार केले आहे. ध्वनिप्रदूषण करणाऱ्या फेरीवाल्यांकडील पिपाणी आणि तत्सम वस्तूंबरोबरच रस्त्यावरील खाद्यपदार्थ बनविणाऱ्या फेरीवाल्यांवर बंदी घालण्यात येणार आहे. स्टोव्ह अथवा गॅसवर खाद्यपदार्थ बनविले जातात. त्यामुळे दुर्घटना घडू शकते. विशेष फेरीवाला पथक अशा वस्तू जप्त करून कारवाई करणार आहे. वाहतुकीस अडथळा होऊ नये, तसेच आपत्कालीन परिस्थितीत जमाव नियंत्रणात आणण्यासाठी गणेशोत्सव मंडळांचा परिसर फेरीवालामुक्त करण्यात येणार आहे. विशेष पथकांची नियुक्तीमहिला आणि बालकांच्या संरक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. छेडछाडविरोधी पथक, मोबाईल चोरीविरोधी पथक, सोनसाखळी चोरीविरोधी पथक, आदी विशेष पथके यंदाही कार्यरत राहणार आहेत. पाच मुद्द्यांवर अधिक भर गणेशोत्सवाच्या बंदोबस्तामध्ये प्रामुख्याने जमाव नियंत्रण, कायदा आणि सुव्यवस्था, मिरवणुकीचे संरक्षण, रस्त्यावरील गुन्हे रोखणे, वाहतूक व्यवस्था सुरळीत राखणे या पाच मुद्द्यांवर अधिक भर दिला जातो. त्यानुसार पोलिसांनी बंदोबस्ताची व्यूहरचना आखली आहे. विसर्जन मिरवणूक हा यामधील सर्वांत महत्त्वाचा भाग आहे. मिरवणुकीदरम्यान गणेशाची मूर्ती आपल्या स्थानावरून विसर्जन स्थळापर्यंत जाईपर्यंत विविध प्रकारचा बंदोबस्त असतो. यावेळी अनेक मार्ग बंद केले जाणार आहेत. तसेच अनेक मार्ग एकदिशा केले जाणार आहेत. ज्या मार्गावर विसर्जन मिरवणूक जाईल, तेथे अगदी सायकलीलासुद्धा पार्किंग करायला परवानगी नाकारली आहे. याबाबत नागरिकांना सतत ध्वनिक्षेपकामार्फत सूचना दिल्या जाणार आहेत. बाहेरील जिल्'ांतून काही प्रमाणात पोलिस बंदोबस्त मागवून घेतला जाणार आहे.