शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
2
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
3
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
4
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
5
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
6
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
7
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
8
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार
9
इंजिनीअर तरुणाने आईच्या मदतीने पत्नीला संपवलं, मृतदेह चादरीत गुंडाळला अन्...; कारण ऐकून होईल संताप!
10
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला बाप्पाला दूर्वा सोडून का वाहिली जाते तुळस?
11
ड्रीम११ आणि My11Circle चे भविष्य धोक्यात? ऑनलाइन गेमिंग बिलामुळे 'हे' प्लॅटफॉर्म कायमचे बंद होणार?
12
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
13
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
14
पत्नीचा मृतदेह पाहून पतीला बसला धक्का, एका कोपऱ्यात बसला आणि तासाभरातच...  
15
Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई
16
Ganesh Chaturthi 2025: बाप्पा आपल्या भेटीला येतोय, पण कधी 'या' गुप्त गणेश मंदिरात बाप्पाची भेट घ्या!
17
शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली 'सावली', प्राप्ती रेडकरचा ग्लॅम लूक; सोबत दिसली 'भैरवी'
18
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
19
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
20
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष

देऊरला सोयाबीनपासून होणार दूधनिर्मिती

By admin | Updated: July 28, 2015 00:29 IST

परिवर्तनाची पहाट : दररोज एक हजार लिटर उत्पादनाचा संकल्प

दुधासाठी गाय, म्हैस, शेळी ही संकल्पना बदलून आता सोयाबीनपासून पौष्टिकदूध व दुग्धजन्य पदार्थ बनविण्याचा प्रयोग सातारा जिल्ह्यात पहिल्यांदाच देऊरमधील शेतकऱ्याने हाती घेतला आहे. यासाठी लागणाऱ्या यंत्रसामुग्रीची जोडणी पूर्ण झाली असून, थोड्याच दिवसांत हा प्रकल्प सुरूहोत आहे.शेती व्यवसायात दिवसेंदिवस आमूलाग्र बदल घडत आहेत. पिढीजात असलेल्या शेतीच्या पद्धतीमध्ये बदल झाला आहे. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून ही खेडोपाडी दुग्ध व्यवसाय केला जातो. मात्र,अलीकडच्या काळात हा व्यवसायही न परवडणाराच झाला आहे. जनावरांच्या वर्षभरातील पालनपोषण खर्चाचा हिशोब काढल्यास या व्यवसायातून शेतकऱ्याच्या हाती काहीच लागत नाही, असेच चित्र ग्रामीण भागात आहे.आता घरबसल्या चार ते पाच लोकांच्या माध्यमातून प्रतिदिन १ हजार लिटर दुधाचे उत्पादन सोयाबीन पिकापासून होणार आहे. उत्पादित होणारे दूध हे किमान ३० दिवस खराब होत नाही. दुधाबरोबरच पनीर, लस्सीसारखी दुग्ध उत्पादने घेतली जाणार असल्याने या उत्पादनास बाजारपेठेत मागणी चांगली राहणार आहे. व्यायामशाळा,वसतिगृह, हॉस्पिटल, हॉटेलमध्ये हे दूध स्ट्राबेरी, मॅगो या फ्लेवरमध्ये दूध मिळणार आहे.गाई, म्हशीच्या दुधापेक्षा या दुधात ३० टक्के व्हिटॅमिन जास्त असल्याने शरीरासाठी हे दूध पौष्टिक मानले जात आहे. साधारण एक हजार लिटर दुधासाठी २०० ते २५० किलो सोयाबीन या प्रकल्पासाठी प्रतिदिन लागणार आहे. तयार दूध हे प्रक्रिया करून ३०० मिलीमीटरमधील बॉटलमध्ये पॅकिंग केले जाणार आहे. याची किंमत साधारणत: ३० ते २५ रुपये असणार आहे.जिल्ह्यातील सोयाबीनपासून दूधनिर्मितीचा हा पहिलाच प्रकल्प सुरूहोत आहे. यासाठी लागणारी सर्व यंत्रसामुग्रीची जोडणी पूर्ण होऊन याबाबत चाचणी यशस्वी झाली आहे. काही दिवसांतच हा प्रकल्प आता कार्यरत होऊन प्रत्यक्षात दुधाचे उत्पादन सुरू करणार आहे.