शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘भू-विकास’साठी मुख्यमंत्र्यांसमोर गाऱ्हाणे

By admin | Updated: March 26, 2015 00:27 IST

मुंबईत बैठक : मंत्रिमंडळ उपसमितीच्या अहवालानंतर ठोस निर्णयाचे आश्वासन

सांगली : आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेल्या राज्यातील भू-विकास बँकांच्या प्रश्नावर भाजप सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी राज्य सहकारी भू-विकास बँक कर्मचारी संघटनेने मंगळवारी सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. बँकांची आर्थिक वस्तुस्थिती व अधिकाऱ्यांकडून सुरू असलेला चुकीच्या आकडेवारीचा खेळ याबाबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गाऱ्हाणे मांडले. राज्यातील भू-विकास बँकांच्या पुनरुज्जीवनाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून शासनदरबारी लटकला आहे. भू-विकास बँकांच्या आर्थिक स्थितीचा व त्यावरील निष्कर्षांचा अहवाल चार्टर्ड अकाऊंटंट डी. ए. चौगुले समितीने तत्कालीन आघाडी शासनाकडे सादर केला होता. बऱ्याच वर्षांच्या प्रतीक्षेनंतरही आघाडी सरकारला याबाबत निर्णय घेता आला नाही. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर भू-विकास कर्मचारी संघटनेने नव्या सरकारदरबारी पाठपुरावा सुरू केला आहे. या प्रश्नाबाबत मंत्रिमंडळ उपसमिती नियुक्त झाली असून, उपसमितीच्या अनेक बैठकाही झाल्या आहेत. लवकरच हा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी फडणवीस यांच्याशी चर्चा केली. संघटनेचे कार्याध्यक्ष एम. पी. पाटील व शिष्टमंडळाने गाऱ्हाणे मांडले. आघाडी सरकारच्या कालावधीत या प्रश्नावर फडणवीस व तत्कालीन भाजप आमदारांनी संघटनांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शविला होता. या गोष्टीची आठवण पदाधिकाऱ्यांनी करून दिली. त्यामुळे भाजपने या बँकांबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. मंत्रिमंडळ उपसमितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कर्मचारी संघटनेशी चर्चा करून याबाबत योग्य सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन फडणवीस यांनी दिल्याची माहिती एम. पी. पाटील यांनी दिली. (प्रतिनिधी)चौगले समितीच्या शिफारसी अभ्यासाव्यातभू-विकास बँका आणि शासन यांच्यातील येण्या-देण्याबाबत सहकार विभागातील अधिकारी दिशाभूल करीत आहेत. चुकीची आकडेवारी समोर आल्यानंतर शासनाचा बँकांबाबत नकारात्मक विचार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चौगुले समितीच्या शिफारसींचा अभ्यास करून निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.