शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे पुरस्कार जाहीर

By admin | Updated: May 16, 2017 18:51 IST

पुरस्कार प्रदान समारंभ २५ मे रोजी

आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. १६ : दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेतर्फे दरवर्षी देण्यात येणाऱ्या २0१६ मधील ग्रंथ पुरस्कारांसाठी विश्वास नांगरे-पाटील, आनंद पाटील, विजय माळी, सचिन पाटील, डॉ. सुनिता बोर्डे, सिराज मोमीन, प्रकाश केसरकर,जयश्री दानवे यांच्यासह मान्यवर लेखकांच्या पुस्तकांची निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार प्रदान समारंभ गुरुवार, दि. २५ मे रोजी दसरा चौकातील शाहू स्मारक भवन येथील मिनि सभागृहात सकाळी ११ वाजता होणार आहे.दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेतर्फे दरवर्षी कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यासह कर्नाटकस्थित मराठी लेखकांच्या उत्कृष्ट साहित्यकृतींना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येते. २0१६ या वर्षात प्रसिध्द झालेली ७२ पुस्तके पुरस्कारासाठी प्राप्त झाली होती. डॉ. माहन पाटील, प्राचार्य विश्वास सायनाकर, डॉ. गिरिश मोरे, गोविंद गोडबोले यांच्या निवड समितीने ही निवड केली असल्याची माहिती उपाध्यक्ष गौरी भोगले आणि सहकार्यवाह डॉ. विनोद कांबळे यांनी दिली आहे. देवदत्त पाटील पुरस्कार : विजय माळी (आर्त माझ्या बहु पोटी-कादंबरी), शंकर खंडू पाटील पुरस्कार : सचिन वसंत पाटील (अवकाळी विळखा-कथा), शैला सायनाकर पुरस्कार : डॉ. सुनिता बोर्डे-खडसे (अस्तित्वाचा अजिंठा कोरताना-कविता), कृ. गो. सूर्यवंशी पुरस्कार : विश्वास नांगरे-पाटील (मन में है विश्वास-संकीर्ण), अण्णाभाउ साठे पुरस्कार : डॉ. आनंद पाटील (ग्रंथांनी रचलेला महापुरुष), चैतन्य माने पुरस्कार : सिराज बाबालाल मोमीन (आपण कुनापयकी?-प्रथम प्रकाशन), बालसाहित्य पुरस्कार : प्रकाश केसरकर (जंगल शाळा) विशेष पुरस्कार : डॉ. आनंद यादव पुरस्कार : मधुबन पिंगळे (त्याने जग बदलताना पाहिले), वामन होवाळ पुरस्कार : डॉ. नलिनी महाडिक (इभ्रत), बाबुराव पेंटर पुरस्कार : अपर्णा पाटील (आॅस्कार), बाळ पोतदार (येणे वाग्यज्ञे), भूपाल हंकारे (गुरुदेव), विजयाग्रज (पैल), जयश्री दानवे (सांगितिक दीपस्तंभ), डॉ. सतिश कामत (दलित आत्मकथनातील व्यक्तिरेखा), डॉ. प्रशांत गायकवाड (आ.ह.साळुंखे विचारप्रवर्तक मुलाखती), डॉ. नितीन शिंदे (अंतराळ समजून घेताना), डॉ. एकनाथ आळवेकर (दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे वाड:मयीन कार्य), नंदू साळोखे (जांभळीखालचा झरा), बाबुराव पाटील (गावाकडची माती), दीपक फाळके (नकोय आम्हाला महासत्ता), युवराज कदम (कट्ट्यावरची पुस्तके), चैत्र (पायवाट), रमेश खंडागळे (सल)