शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
2
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
3
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
4
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
5
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
6
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
7
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
8
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
9
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
10
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
11
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती
12
महिला विश्वचषक : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला दिला धडा, मूनीचे निर्णायक शतक
13
जब गिल पर आया दिल, तो रोहित क्या चीज हैं !
14
महिला विश्वचषक : फलंदाजांना दाखवावा लागेल दम, आज दक्षिण आफ्रिकेच्या कडव्या आव्हानाचा करणार सामना
15
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
16
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
17
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
18
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
19
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
20
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या

कोल्हापूर दक्षिण व चंदगडची अदलाबदल शक्य

By admin | Updated: July 19, 2014 00:21 IST

दोन्ही पक्षांतील कुरघोडीचे राजकारण

विश्वास पाटील ल्ल कोल्हापूर कोल्हापूर दक्षिण व चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या महायुतीत अदलाबदल करण्यात येणार असल्याच्या हालचाली आहेत, असा निर्णय लोकसभा निवडणुकीवेळीच शिवसेना व भाजपमध्ये झाला होता व त्यास भाजपच्या नेत्यांनी संमती दिल्याचे शिवसेनेच्या नेत्यांचे म्हणणे आहे, अशी अदलाबदल करण्यात या दोन्ही पक्षांतील कुरघोडीचे राजकारणही कारणीभूत आहे. सध्या कोल्हापुरातील दहापैकी आठ जागा शिवसेनेकडे, तर इचलकरंजी व कोल्हापूर दक्षिण या दोन जागा भाजपकडे आहेत. प्रदेश भाजपने लोकसभा निवडणुकीतील यशानंतर जागा वाढवून देण्याचा आग्रह धरला आहे; परंतु त्यास शिवसेना तयार नाही. महायुतीत या दोन पक्षांशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटना,राष्ट्रीय समाज पक्ष व रिपब्लिकन (आठवले गट) पक्षही सहभागी आहेत. जिल्ह्यात आठवले गटाची ताकद आहे; परंतु हातकणंगले विधानसभा या राखीव मतदारसंघातून शिवसेनेचे सुजित मिणचेकर आमदार असल्याने पुन्हा या पक्षाला जागा दिली जाण्याची शक्यता नाही. मध्यंतरी दुर्वास कदम यांनी वाढदिवसाचे शहरभर फलक लावून शक्तिप्रदर्शन केले. त्यामागे दक्षिणमधील उमेदवारीचे राजकारण होते. शिवसेना-भाजपशिवाय महायुतीत ‘स्वाभिमानी’ हा प्रबळ घटक पक्ष आहे. या पक्षाने किमान पाच जागांची मागणी केली आहे; परंतु ‘स्वाभिमानी’ला कुणाच्या कोट्यातील जागा द्यायच्या, हा खरा वादाचा मुद्दा बनत आहे. त्यामुळे शिवसेना व भाजप प्रत्येकी एक जागा ‘स्वाभिमानी’साठी सोडण्याच्या विचारात आहेत. त्यातील ‘शिरोळ’ शिवसेना सोडणार आहे. भाजपकडे दोनच मतदारसंघ आहेत. त्यातील ‘कोल्हापूर दक्षिण’मध्ये ‘स्वाभिमानी’ची ताकद नाही. त्यामुळे चंदगडची जागा शिवसेनेने भाजपला द्यायची व त्याबदल्यात भाजपने कोल्हापूर दक्षिणची जागा शिवसेनेला द्यायची, असा हा अदलाबदलीचा प्रस्ताव आहे. त्यामुळे भाजपच्या वाट्याची एक चंदगडची जागा स्वाभिमानीसाठी सोडता येऊ शकेल, असे त्यामागील गणित आहे. या हालचाली ज्यांना मान्य नाहीत त्याच नेत्यांनी ‘कोल्हापूर उत्तर’वर दावा करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. अडचणीच जास्त... ही जागा जरी भाजपने सोडली, तरी दोनच जागांवर स्वाभिमानी तयार होण्याची शक्यता नाही. शिरोळ, राधानगरी व चंदगड या तीन मतदारसंघांत ‘स्वाभिमानी’ची चांगली ताकद आहे. राधानगरी मतदारसंघात जिल्हाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील यांच्या नावाची घोषणा प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी करूनच टाकली आहे. त्याशिवाय स्वाभिमानीला शाहूवाडी हादेखील मतदारसंघ अथवा आम्ही म्हणतो तोच उमेदवार, असा खासदार राजू शेट्टी यांचा आग्रह आहे. ‘स्वाभिमानी’...बद्दल स्वाभिमानी हा पक्ष भाजपच्या कोट्यातील आहे. त्यामुळे भाजपनेच त्यांना जागा सोडाव्यात, असा पवित्रा शिवसेनेने घेतला आहे. लोकसभेत संघटनेची मदत न झाल्यामुळेच संजय मंडलिक यांचा पराभव झाला, असे शिवसेनेच्या नेत्यांनी वरिष्ठ नेतृत्वाला कळविले आहे, तर शिवसेनेतील लाथाळ्यांमुळेच मंडलिक पराभूत झाल्याचा दावा संघटनेने केला आहे. शिवसेना अशी कोंडी करण्याची चिन्हे दिसल्यानेच ‘स्वाभिमानी’नेही स्वतंत्र लढण्याच्या दृष्टीने चाचपणी सुरू केली आहे.