शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

चांगला सूर गवसण्यात वेगळीच धुंदी

By admin | Updated: January 13, 2016 01:12 IST

सलील कुलकर्णी : सी. जी. कु लकर्णी वाङ्मय मंडळाच्या व्याख्यानमालेत प्रकट मुलाखत; श्रोत्यांची अलोट गर्दी

कोल्हापूर : ‘एखादं गाणं, कविता सूचणे ही प्रक्रिया फार आनंददायी असते. चांगला सूर गवसण्यात धुंदी असते. त्यामुळे मिळणारे समाधान अध्यात्मातील समाधानाइतकेच श्रेष्ठ असते’ अशा शब्दांत ‘दमलेल्या बाबाची कहाणी’ या गीताचे लेखक, संगीतकार, गायक, डॉ. सलील कुलकर्णी यांनी आपल्या जीवनातील संगीताचे महत्त्व विशद केले.येथील न्यू एज्युकेशन सोसायटी, संचलित सी. जी. कुलकर्णी वाङ्मय मंडळा व्याख्यानमालेत संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांची प्रकट मुलाखत मंगळवारी राम गणेश गडकरी सभागृहात आयोजित करण्यात आली. तेव्हा त्यांनी श्रोत्यांशी मनमोकळा संवाद साधला. विक्रांत देशमुख यांनी त्यांना बोलते केले. यावेळी सभागृह खचाखच भरले होते. डॉ. कुलकर्णी म्हणाले, ‘संगीत, लिखाण, गायन ही समर्पणाची गोष्ट असते. स्वत:ला सिध्द करायला जाऊ नये, शक्य तितके चांगले करण्याचा प्रयत्न करावा. एखादे गाणे, भावगीत, कविता सुचण्याचे क्लासेस नसतात. त्यासाठी प्रतिभा असणे गरजेचे असते आणि प्रतिभा उत्सुकतेपोटी अधिक बहरत जाते. उत्सुकता संपली की नवीन काही सूचण्याची प्रक्रिया संपते. सुचण्याची प्रक्रिया ही त्या कलाकाराची स्वत:च्या मालकीची असते. ती त्याच्याकडून कोणी काढून घेऊ शकत नाही. जेव्हा एखादी गोष्ट मनापासून करावी वाटते तेव्हा के ली की ती जास्त चांगली बनते. ’बालक-पालक संबंधावर बोलताना डॉ. कुलकर्णी म्हणाले, आपण मुलांच्या मनात भीती निर्माण करण्यास जबाबदार असतो. त्याला अंधाराची भीती घालतो. त्याने चिखलमातीत खेळू नये म्हणून महागडी खेळणी आणून देतो. आपण त्यांच्यासाठी देश, राज्य, धर्म, जातीच्या सीमा आखतो आणि त्यांना संकुचित बनवतो. प्रत्येकवेळी आपण त्यांना देत राहतो. त्यांनाही काही नवीन गोष्टी सांगायच्या असतात, त्यादेखील ऐकून घ्यायला हव्यात. मुलांकडून जास्त अपेक्षा न ठेवता त्यांना मुलांसारखं मोठं होऊ द्यावं, नाहीतर ती कोमेजतात.यावेळी सी. जी. कुलकर्णी गीतगायन, कथाकथन, वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. सूत्रसंचालन प्रा. स्नेहा फडणीस यांनी केले. प्रास्ताविक चित्रा कशाळकर यांनी केले. यावेळी वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष नितीन वाडीकर, उपाध्यक्ष एस. के. कुलकर्णी, मदनमोहन सांस्कृतिक मंचचे अध्यक्ष विनोदकुमार लोहिया, पद्माकर सप्रे, आदी उपस्थित होते. कविता सादरमुलाखतीवेळी संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांनी कवी ग्रेस, आरती प्रभू, बा. भ. बोरकर, शांता शेळके, अरुणा ढेरे यांच्या कवितेतील काही ओळी सादर केल्या. उपस्थित रसिकांनी यावेळी टाळ्यांच्या कडकडाटात कवितांना दाद दिली.