शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

‘थम्ब’ करताच रेशन दुकानदाराच्या खात्यावर पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 23:26 IST

प्रवीण देसाई ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : धान्य खरेदीनंतर ग्राहकाने ‘थम्ब इंप्रेशन’ (अंगठ्याचा ठसा) करताच त्याच्या बॅँक खात्यातील पैसे रेशन दुकानदाराच्या खात्यावर क्षणात जमा होणार आहेत. त्या दृष्टीने बायोमेट्रिक रेशनिंग प्रणालीमधील ‘ई-पॉस’ मशीन अद्ययावत करण्याचे काम सुरू झाले आहे. यासुविधेची राज्यव्यापी अंमलबजावणी महिन्याभरात कोल्हापुरात होत आहे.सध्या ई-पॉस मशीनद्वारे ग्राहकाचा अंगठ्याचा किंवा ...

प्रवीण देसाई ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : धान्य खरेदीनंतर ग्राहकाने ‘थम्ब इंप्रेशन’ (अंगठ्याचा ठसा) करताच त्याच्या बॅँक खात्यातील पैसे रेशन दुकानदाराच्या खात्यावर क्षणात जमा होणार आहेत. त्या दृष्टीने बायोमेट्रिक रेशनिंग प्रणालीमधील ‘ई-पॉस’ मशीन अद्ययावत करण्याचे काम सुरू झाले आहे. यासुविधेची राज्यव्यापी अंमलबजावणी महिन्याभरात कोल्हापुरात होत आहे.सध्या ई-पॉस मशीनद्वारे ग्राहकाचा अंगठ्याचा किंवा बोटाचा ठसा घेऊन दुकानदाराकडून ग्राहकाला धान्य दिले जाते. या मशीनवर ठसा उमटविल्यावर आपल्याला देय असलेल्या धान्याची पावती येते. मग त्यानंतर धान्य वितरित केले जाते. अशा पद्धतीने या मशीनद्वारे रेशनिंगचे व्यवहार सुरू आहेत. शासनाने यापुढील पाऊल उचलत या मशीनवर दुसऱ्यांदा ठसा उमटविल्यावर आता धान्य खरेदीनंतर ग्राहकाच्या खात्यावरील पैसे दुकानदाराच्या खात्यावर क्षणात जमा होतील, अशी सुविधा केली आहे. त्या दृष्टीने मशीनचे अद्ययावतीकरण करण्याचे काम संबंधित यंत्रणेकडून सुरू आहे. यामध्ये काही प्रोग्रॅम बदलले असून, यातील सॉफ्टवेअरही बदलले आहे. या सुविधेची राज्यव्यापी अंमलबजावणी बायोमेट्रिक रेशनिंग प्रणालीमध्ये अव्वल स्थानी असणाºया कोल्हापूर जिल्ह्यातून होणार आहे. सध्या नागपूरमध्ये प्रायोगिक तत्त्वावर याचे काम सुरू आहे.आर्थिक व्यवहारासाठी कराव्या लागणाºया किचकट आॅनलाईन प्रक्रियेमुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागते. विशेषत: ग्रामीण भागातील लोकांना ही अडचण जाणवते. या सुविधेच्या निमित्ताने सरकारने रेशनिंगमध्येही कॅशलेस व्यवहारासाठी चालना दिली आहे.असे होतील व्यवहारया मशीनवर पहिला ठसा उमटविल्यावर धान्याची पावती येऊन धान्य मिळणार.दुसरा ठसा उमटविल्यावर खात्यातून संबंधित दुकानदाराच्या खात्यात रक्कम जमा होणार.जितके धान्य घेणार, तितकी निश्चित केलेली रक्कम ग्राहकाच्या खात्यातून कमी होणार.