शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

लवकरच ११ शासकीय दंत महाविद्यालये

By admin | Updated: January 22, 2017 00:43 IST

प्रस्ताव पाठविण्याचे आदेश : शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचाही समावेश

गणेश शिंदे --कोल्हापूर -राज्यात १६ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांपैकी मुंबई, नागपूर, औरंगाबाद या तीन ठिकाणीच सध्या दंतवैद्यकीय शासकीय महाविद्यालये आहेत. या तीन शासकीय दंतवैद्यकीय महाविद्यालयांतून वर्षाला १८० विद्यार्थी दंत शस्त्रक्रिया पदवी (बीडीएस) घेऊन बाहेर पडतात. लोकसंख्येच्या मानाने सध्या ही संख्या अपुरी आहे; पण भविष्याचा विचार करून राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे.राज्यातील ११ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना दंत महाविद्यालयाचा प्रस्ताव पाठविण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण विभागाने दिले आहेत. यामध्ये कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचाही समावेश आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सध्या वारणानगर येथे केवळ एकच खासगी दंतवैद्यकीय महाविद्यालय आहे. या ठिकाणी १०० विद्यार्थ्यांची क्षमता आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यासह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा या आसपासच्या जिल्ह्यांतील रुग्णांना या शासकीय दंतवैद्यकीय महाविद्यालयाचा फायदा मिळणार आहे. दरम्यान, २००२ ला तत्कालीन सार्वजनिक आरोग्यमंत्री दिवंगत दिग्विजय खानविलकर यांच्या प्रयत्नांतून शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले.भारतीय दंत परिषदेच्या नवीन मानांकनानुसार नवीन दंत महाविद्यालयास परवानगी ही संलग्नित वैद्यकीय महाविद्यालय असल्यानंतरच मिळणार आहे. या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना प्रस्ताव पाठविण्याचे आदेश देऊन प्रत्येक महाविद्यालयासाठी नोडल आॅफिसर नेमण्यात आले आहेत. याचा आढावा संबंधित नोडल आॅफिसरकडे वैद्यकीय महाविद्यालयाने द्यावयाचा आहे. दरम्यान, याबाबत मुंबईत वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. प्रवीण शिणगारे व अतिरिक्त मुख्य सचिव मेघा गाडगीळ यांच्या उपस्थितीत ११ वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता यांची बैठक झाली. या बैठकीत हे लेखी आदेश देण्यात आले. दृष्टिक्षेपात... शासकीय दंत महाविद्यालयजिल्हाक्षमता मुंबई१००नागपूर४०औरंगाबाद४०कोल्हापुरातील शासकीय दंत महाविद्यालयात स्थानिक मुला-मुलींना प्रवेश मिळण्यास यामुळे मदत होणार आहे. तसेच रुग्णांवर नाममात्र दरात उपचार होतील. हा निर्णय कोल्हापूरकरांना उपयुक्त ठरणार आहे.- डॉ. जयप्रकाश रामानंद, अधिष्ठाता, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर. बुधवारी (दि. २५) शेंडा पार्कची पाहणीकोल्हापुरात राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नवे दंत महाविद्यालय शेंडा पार्क येथील महाविद्यालयाच्या जागेत होणार आहे. यासाठी ‘सीपीआर’च्या दंत विभागप्रमुख डॉ. लता खोब्रागडे प्रस्ताव बनवीत आहेत. मुंबई येथील शासकीय दंत महाविद्यालयाचे दंतविकृती व अणुजीवशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. जगदीश तुपकरी हे बुधवारी (दि. २५) कोल्हापुरात येणार आहेत. ते जागेची पाहणी करणार असल्याचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी सांगितले.