शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
3
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
4
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
5
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
6
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
7
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
8
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
9
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
10
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
11
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
12
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
13
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
14
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
15
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
16
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
17
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
18
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
19
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

स्टेजवरून पडून मुलाचा मृत्यू

By admin | Updated: May 4, 2017 23:14 IST

बीड : तालुक्यातील पारगाव जप्ती येथे लग्नाच्या स्टेजवरून पडल्याने एका मुलाचा मृत्यू झाला.

शिवाजी सावंत -- गारगोटी -लोटेवाडी (ता. भुदरगड) येथील पिण्याचा पाणीप्रश्न गेल्या ३० वर्षांपासून गंभीर बनत आहे. पाण्यासाठी लाखो रुपयांच्या नळपाणी योजनांसाठी निधी खर्च करूनही ग्रामस्थांना एकवेळही पाणी मिळत नाही. तहानलेल्या लोटेवाडीच्या पाणीप्रश्नी शासनला पाझर फुटणार का? हा प्रश्न निर्माण झाला आहे.शासनाने टंचाईग्रस्त व जलयुक्त शिवार योजनेत लोटेवाडीचा समावेश केला आहे. याबाबत प्रशासनाकडून पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटावा, याकरिता उपाययोजना आखली जात आहे. मिणचे खुर्दपासून पुढील लोटेवाडी गावापर्यंत जलयुक्त शिवार योजनेतून काळम्मावाडी धरणाच्या कालव्याचे पाणी सायफनने मिळाल्यास गावची शेती सुजलाम्, सुफलाम् होईल. या कालव्याचे अंतर फक्त दीड कि.मी. आहे. लोकसहभाग व महाराष्ट्र शासन यांच्या पुढाकाराने हा प्रश्न निकाली निघू शकतो. कालव्याचे पाणीच तारणहार असून, तहानलेल्या लोटेवाडीला आता हा एकच पर्याय उरला आहे. शासनाने मिणचे खुर्द ते लोटेवाडी गावापर्यंतच्या कालव्याला पाणी योजनेसाठी मंजुरी द्यावी, अशी मागणी लोटेवाडी ग्रामस्थांकडून होत आहे . लोटेवाडी येथे सध्या तीव्र पाणीटंचाई आहे. गावाला पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी शासनाने पाणीपुरवठा योजनांवर लाखो रुपये खर्च करूनही लोटेवाडी (ता. भुदरगड) गावाला गेली अनेक वर्षे घागरभर पाण्यासाठी महिलांसह आबालवृद्धांना वणवण भटकावे लागत आहे.भुदरगड तालुक्यातील लोटेवाडी हे १४०० लोकवस्तीचे गाव. या गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटावा यासाठी शासनाने आतापर्यंत तीन नळ पाणीपुरवठा योजना मंजूर केल्या, पण त्या कुचकामी ठरल्या आहते. यानंतर सन १९९२-९४ मध्ये बसुदेव धनगरवाड्याजवळील जंगलातून ओढ्यावरील झऱ्याच्या उगमावर पाण्याची टाकी बांधून तीन किलोमीटर अंतरावरून सायफन पद्धतीने डोंगर उतारावरून पाणी आणण्यात आले. झऱ्याच्या पाण्याला पाझर आहे तोपर्यंतच पाणीपुरवठा होत होता. पाण्याचा नैसर्गिक स्रोत कमी होऊन ही योजना कुचकामी ठरली. गावामध्ये दोन हातपंप आहेत; पण पाणीपातळी खालावल्यामुळे एक घागर पाण्यासाठी दीर्घ वेळ थांबावे लागते. यासाठी अनेक महिला घागरी घेऊन पहाटेपासूनच रांगेत असतात. २०१२ साली राष्ट्रीय पेयजल योजनेतून २८ लाख ६० हजार रुपये खर्चाची नवीन नळ पाणीपुरवठा योजना मंजूर झाली. मिणचे खुर्द व मोरेवाडी दरम्यानच्या मोरओव्हळ या ओढ्यावर जलकुंभ बांधण्यात आला; पण ओढ्यालाच पाणी नसल्याने जलपातळी खालावून या योजनेतूनही पाणीपुरवठा होत नाही. गावासाठी तीन-तीन नळ पाणीपुरवठा योजना राबविल्या तरीही गेली कित्येक वर्षे गावास तीव्र पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. याबाबत ग्रामस्थांनी प्रशासनाकडे अनेकवेळा तक्रारी केल्या होत्या; पण यावर ठोस उपाययोजना झाली नाही. घर बांधकाम, लग्न समारंभ, यात्रा, जत्रा यासाठी टँकरने पाणी विकत आणावे लागते. पाण्याच्या ओढाताणीमुळे महिला वर्ग व गावकरी हैराण झाले आहेत. त्यामुळे शासनानेच लोटेवाडीच्या पाणीटंचाईवर ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.छोटे गाव; पण राजकारणाचा अड्डा गावात गटा-तटाचे राजकारण होते. गावच्या विकासकार्यातही गटाचे राजकारण आडवे येते. पुढारीच लोटेवाडीच्या विकासकार्याला खीळ घालत आहेत. वर्षानुवर्षे न सुटलेले प्रश्न आमदार, खासदार, मंत्री किंवा अधिकारी यांना निवेदन देऊनही सोडविले जाऊ शकतात; पण भेटणार कोण? तर ग्रामपंचायतही यासाठी पुढाकारही घेत नाही. आम्ही निवडून देऊन काय उपयोग? असा सवालही त्रस्त ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.