शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

सोनोग्राफी मशीनच्या सॉफ्टवेअरची सीडी रिकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:28 IST

: डॉ. काटकर दाम्पत्याची कसून चौकशी इचलकरंजी : गर्भलिंग निदान केल्याप्रकरणी अटक केलेल्या डॉ. भाऊसाहेब काटकर याच्यासह त्याची पत्नी ...

: डॉ. काटकर दाम्पत्याची कसून चौकशी

इचलकरंजी : गर्भलिंग निदान केल्याप्रकरणी अटक केलेल्या डॉ. भाऊसाहेब काटकर याच्यासह त्याची पत्नी वैशाली या दोघांची गुरुवारी दिवसभर कसून चौकशी करण्यात आली, तसेच नर्सिंग अ‍ॅक्टच्या परवान्याची मुदत संपली आहे. सोनोग्राफी मशीनकरिता आवश्यक असलेली सॉफ्टवेअरची सीडी रिकामी आढळली आहे. पार्वती मुराळे (रा. लंगोटे मळा) या वृद्धेची चौकशी सुरू आहे.

काटकर हॉस्पिटलमध्ये प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान चाचणी केली जात असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस व आरोग्य विभागाने संयुक्त छापा टाकून डॉ. काटकर याला रंगेहात पकडले होते. यामध्ये ग्राहक शोधणे, पोहोचवणे याचे रॅकेट आहे का, अशी तपासणी सुरू आहे. पार्वती या वृद्धेच्या माध्यमातून पथक रुग्णालयापर्यंत पोहोचले होते. या प्रकरणात रिक्षाचालकाचा संबंध असल्याने एका रिक्षाचालकाकडेही तपास सुरू आहे; परंतु पार्वतीला मदत करणाऱ्या रिक्षाचालकाचा अद्याप शोध लागलेला नाही.

जिल्हा शल्यचिकित्सक विलास देशमुख, गर्भलिंग निदान पथकाच्या अ‍ॅड. गौरी पाटील, आयजीएमचे रवीकुमार शेट्ये यांचे पथक दिवसभर ठाण मांडून होते. ताब्यात घेतलेली कागदपत्रे व रेकॉर्ड तपासणीचे काम सुरू आहे. गर्भपाताच्या अनुषंगाने लागणारी कागदपत्रे रुग्णालयात आढळली नाहीत; परंतु गर्भपातासाठी लागणारी अवजारे आढळली आहेत, तसेच संबंधितांचे जबाबही नोंदविण्यात येत आहेत. चौकशी पूर्ण झाल्यानंतर आणखी माहिती उघडकीस येण्याची शक्यता आहे. नर्सिंग अ‍ॅक्टच्या परवान्याची मुदत संपल्याने त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.