शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

‘मिका’च्या गाण्याने तरुणाई बेधुंद

By admin | Updated: July 27, 2014 01:12 IST

भव्य रॅम्पमुळे बॉलिवूडचा फील : आंतरराष्ट्रीय दर्जाची ध्वनियंत्रणा, डोळे दिपवणारी प्रकाश यंत्रणा

कोल्हापूर : बॉलिवूडचा प्रसिद्ध पॉप सिंगर मिका सिंगची एकाहून एक अफलातून गाणी, अभिनेत्री प्राची देसाई, टी.व्ही कलाकार अनिता हसनंदानी यांचा बहरदार डान्स आणि डी. जे. लेमन, ए. जे. विराट यांच्या संगीतमय साथीमुळे आज, शनिवारची सायंकाळ कोल्हापूरच्या तरुणाईला थिरकायला लावणारी होती. संजय घोडावत इन्स्टिट्यूट(एसजीआय)आणि केबीएम एंटरटेनमेंट यांच्यावतीने आयोजित करण्यात ‘मिका सिंग लाईव्ह इन कोल्हापूर’ हा कार्यक्रम मार्केट यार्ड येथील मुस्कान लॉन येथे झाला. यावेळी पावसाचा व्यत्यय येऊ नये म्हणून संयोजकांनी वॉटरपू्रफ मंडप घातला होता. याचबरोबर आंतरराष्ट्रीय पातळीचे ध्वनिप्रक्षेपण, मोठा रॅम्प यांच्यामुळे थेट मिका सिंग समोर असल्याने तरुणाईच्या आनंदाला अगदी पारावारच उरला नाही. अभिनेत्री प्राची देसाई, अनिता हसनंदानी यांच्या नृत्याचा आनंद थेट तरुण मंडळींनी घेतला, तर अनुषा दांडेकर हिच्या बहरदार निवेदनाने तरुणाईच्या अपेक्षाच वाढत चालल्या होत्या. मिका सिंगने थेट तरुणाईच्या काळजाला हात घालत ‘कसं काय कोल्हापूरकर, बरं हाय का’ असे म्हणत थेट मराठीतून संवाद साधला. सुरुवातीच्या गाण्यांमध्ये ‘दमादम मस्त कलंदर’ या गाण्याने तरुणाईला अगदी बेहोष करून टाकले; तर मिकाच्या साथीला प्राची देसाईच्या नृत्याने अगदी चार चॉँद लावले. उतरोत्तर रंगत चाललेल्या या पॉप गाण्यांमध्ये मिकाने ‘चुरा लिया है तुमने सनम,’ देसी बॉईजमधील ‘सुबह होने लगी, एजंट विनोदमधील ‘पुंगी,’ हाऊसफुल्ल या चित्रपटातील ‘धनो’ आणि इंग्रजी आणि हिंदीचे मिक्सिंग गाणे मुव्ही गो यांनी रंगत आणली. मिका सिंगच्या पंजाबी गाण्यांना ढोलकीची साथ देणाऱ्या कुलदीपसिंग, तारीक भाटिया व लव्हलीसिंग यांनी ‘चुरा लिया तुमने जो दिल को’ हे गाणे गाऊन या कार्यक्रमात आणखी रंगत आणली; तर अनुषा दांडेकरच्या बहरदार निवेदनाने कार्यक्रमाचा गोडवा वाढविला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संयोजक सत्त्वशील माने यांना मिका सिंग यांनी स्टेजवर बोलावून त्यांच्याबरोबर एक गाणे गायिले. (प्रतिनिधी)