गावचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य यांनी धोंडीबा यांचा सत्कार केला. त्यांचे प्राथमिक शिक्षण तावरेवाडी तर माध्यमिक शिक्षण कलमेश्वर विद्यालय सांबरे, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण छत्रपती शिवाजी ज्युनिअर कॉलेज नेसरी व वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण डॉ. टी. से. टोपे नाईट कॉलेज परेल मुंबई येथे झाले आहे.
घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे मुंबईतील एका खासगी कंपनीत शिपाई म्हणून काम करत महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. नोकरी करतच शिक्षण घेते आणि सी.ए. उत्तीर्ण होऊन धोंडिबाने वेगळा ठसा उमटविला आहे.
चौकट....
माझ्या यशामध्ये माझे आई-वडील, नातेवाईक, शिक्षक वर्ग व मित्रपरिवार यांचे खूप मोठे सहकार्य मिळाले आहे. घरचा पाठिंबा असेल तर अशक्य काहीच नाही. प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर यश मिळविता येते.
धोंडीबा जाधव - सी. ए. तावरेवाडी.
धोंडीबा जाधव : १७०९२०२१-गड-१०