शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

सोमवार पेठेत तरुणावर खुनी हल्ला

By admin | Updated: September 15, 2015 01:07 IST

खर्चाला पैसे न दिल्याचे कारण : मुख्य सूत्रधारास अटक, तिघे पसार

कोल्हापूर : सोमवार पेठ येथील देशभूषण हायस्कूलसमोर सोमवारी सकाळी खर्चासाठी पैसे मागूनसुद्धा देत नाही या रागातून चौघा तरुणांनी तरुणास बेदम मारहाण करीत त्याच्या डोक्यात बीअरची बाटली फोडली. त्यामध्ये सद्दामहुसेन मुस्ताकअहमद मुजावर (वय १९, रा. सोमवार पेठ) हा गंभीर जखमी झाला. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, लक्ष्मीपुरी पोलिसांनी संशयित आरोपी विशाल अनिल साळोखे (२१, रा. घिसाड गल्ली) याला अटक केली. त्याचे अन्य तिघे साथीदार पसार असून, त्यांना रात्री उशिरा अटक करण्यात आल्याचे समजते. याबाबत पोलिसांनी सांगितले की, सद्दामहुसेन मुजावर हा विवेकानंद कॉलेजमध्ये कला शाखेच्या पहिल्या वर्षात शिकतो. दोन दिवसांपूर्वी विशाल साळोखे व त्याच्या मित्रांबरोबर त्याचा वाद झाला होता. यावरून साळोखेने त्याला फोनवरून धमकी दिली होती. त्यानंतर दोन्ही बाजूने मध्यस्थीने वाद मिटविला होता. दरम्यान, सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास मुजावर महाराणा प्रताप चौक येथून घिसाड गल्ली मार्गे घरी निघाला होता. देशभूषण हायस्कूलसमोर तो येताच सिद्धांत सूर्यवंशी याने त्याला हाक मारून बोलावून घेतले. त्याला आम्ही वारंवार तुझ्याकडे खर्चासाठी पैसे मागूनसुद्धा तू देत नाहीस, असे म्हणून ठार मारण्याची धमकी दिली. यावेळी त्याच्यासोबत असलेल्या विशाल साळोखे, विजय पवार व रोहन सूर्यवंशी आदींनी त्याला मारहाण केली. यावेळी साळोखेने त्याच्या डोक्यात बीअरची बाटली फोडली. तोपर्यंत सिद्धांत सूर्यवंशी तलवार घेऊन आला. यावेळी हर्षद मोमीन, मुराद मुजावर, सैफ सिराज शेख, आदींनी मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळला.