शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कचऱ्याचा प्रश्न महिन्याभरात सोडवू

By admin | Updated: September 21, 2016 00:42 IST

पी. शिवशंकर : भाजप-ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांना आश्वासन

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडे लागणाऱ्या चार नवीन आर. सी. वाहनांसह आवश्यक तेवढे कंटेनर खरेदी करून येत्या महिन्याभरात शहरातील कचरा उठावाचा प्रश्न निकाली काढला जाईल, असे आश्वासन आयुक्त पी. शिवशंकर यांनी मंगळवारी भाजप-ताराराणी आघाडी नगरसेवकांच्या शिष्टमंडळाला दिले. घरोघरी ओल्या व सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी प्रायोजकाच्या माध्यमातून कचराकुंड्या उपलब्ध करून देण्यावरसुद्धा यावेळी चर्चा झाली. महानगरपालिकेची सभा तहकूब झाल्यानंतर भाजप-ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांनी आयुक्त पी. शिवशंकर यांची भेट घेऊन शहरातील कचरा उठावातील अडचणींबाबत चर्चा केली. विरोधी पक्षनेते संभाजी जाधव यांनी शहरातील कचऱ्याचा उठाव पूर्ण क्षमतेने करावा, घंटागाड्यांची संख्या वाढवावी, प्रत्येक प्रभागात तीन-तीन घंटागाड्या द्याव्यात, कंटेनरची बांधणी महापालिकेच्या वर्कशॉपमध्येच केली जावी, आर.सी. वाहनांवर हायड्रॉलिक प्रणालीच्या वाहनांचे ज्ञान असलेल्या कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी, अशा सूचना केल्या. सध्याच्या आर. सी. वाहनांत प्रमाणापेक्षा जादा कचरा तसेच खरमाती भरली जाते; त्यामुळे ही वाहने खराब झाली आहेत. त्यामुळे अशा प्रमाणापेक्षा जादा कचरा भरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. महिन्याभरात प्राधान्याने नागरिकांच्या आरोग्याच्या, कचरा उठाव, पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नात लक्ष घालावे, असे जाधव यांनी सांगितले. घरोघरी कचऱ्याचे वर्गीकरण झाल्यास कचरा उठावाचे काम अधिक सुलभ होईल, असा मुद्दा चर्चेत पुढे आला. त्यावेळी संभाजी जाधव, सत्यजित कदम, सुनील कदम यांनी प्रायोजकांच्या माध्यमातून कचराकुंडी उपलब्ध करून देता येईल का, याचा विचार केला जाईल. जर शक्य झाले तर अशा कचराकुंड्या दिल्या जातील, असे सांगितले. यावेळी मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील, नगरसेवक राजसिंह शेळके, संतोष गायकवाड, रूपाराणी निकम, जयश्री जाधव, भाग्यश्री शेटके, सविता भालकर, अश्विनी बारामते, पूजा नाईकनवरे, गीता गुरव, मनीषा कुंभार, नीलेश देसाई उपस्थित होते. (प्रतिनिधी)काँग्रेस-राष्ट्रवादीचे शिष्टमंडळही भेटलेमहानगरपालिकेत भाजप-ताराराणी आघाडीच्या नगरसेविकांनी आयुक्त पी. शिवशंकर यांची भेट घेऊन शहरातील कचऱ्याच्या प्रश्नावर चर्चा केल्याची माहिती कळताच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेविकाही आयुक्तांना भेटल्या. त्यांनीही कचऱ्यासह पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नात लक्ष घालावे, असे आवाहन आयुक्तांना केले. महिला बालकल्याण सभापती वृषाली कदम, रिना कांबळे यांच्यासह काही नगरसेविकांचा त्यात समावेश होता.