सोनवणे -बांबवडे तालुका शाहूवाडी येथील उदय साखर कामगार संघटनेच्या आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत साखर कामगारांच्या समोरील समस्या व त्यावरील उपाययोजना यावर सखोल चर्चा झाली. सर्व साखर कामगारांचे प्रश्न राज्यपातळीवर सोडवून सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करू याबाबत राज्यातील पदाधिकाऱ्यांनी कामगारांना आश्वस्त केले.
यावेळी संघटनेचे कोषाध्यक्ष रावसाहेब पाटील, सरचिटणीस शंकरराव भोसले, खजिनदार रावसाहेब भोसले, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष उत्तम मोरे, कार्यकारी संचालक भगवान पाटील, उदय कामगार संघटना अध्यक्ष दीपक पाटील, दीपक शेळके, जगन्नाथ जोशी, आनंदा चौगुले, अनिल पाटील, तानाजी पाटील तसेच संघटनेचे सर्व पदाधिकारी व कामगार उपस्थित होते.