शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

प्रलंबित प्रश्नांचा लवकरच निपटारा करणार

By admin | Updated: November 22, 2014 00:37 IST

चंद्रकांत पाटील : निवेदन स्वीकारून जनतेशी साधला संवाद

कोल्हापूर : विविध विभागांशी संबंधित कोल्हापूरचे प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित आहेत. त्यासंबंधी निवेदने स्वीकारत आज, शुक्रवारी सहकार व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी या सर्व प्रश्नांची सखोल माहिती घेतली. हे प्रलंबित प्रश्न संबंधित विभागांकडे वर्ग करून लवकरात लवकर त्याचा निपटारा केला जाईल, अशी ग्वाही दिली. जनतेशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे.शासकीय विश्रामगृह येथे सकाळी अकरा वाजल्यापासून मंत्री पाटील यांनी नागरिकांची गाऱ्हाणी ऐकायला सुुरुवात केली. त्यामध्ये जिल्हा बँक, गोकुळ दूध संघ यासह विविध विभागाशी संबंधित प्रश्नांबाबत निवेदने देण्यात आली. रात्री आठपर्यंत मंत्री पाटील यांनी लोकांशी संवाद साधला. स्वीकारलेली निवेदने एकत्रित करून ती संबंधित विभागाला वर्ग केली जाणार आहेत. त्यानंतर ते प्रश्न लवकरात लवकर सोडविण्यावर भर दिला जाणार आहे.दिलेल्या निवेदनांमध्ये, महाराष्ट्रातील साखर कामगारांच्या पगारवाढीबाबत संबंधित त्रिपक्ष कमिटी स्थापन करावे, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळातर्फे मंत्री पाटील यांना देण्यात आले. शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष विठ्ठल परबकर, सरचिटणीस शंकरराव भोसले, पंडित चव्हाण, श्रीकांत चव्हाण यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.सहकार न्यायालय क्रमांक १ व २ हे फौजदारी न्यायालयांच्या जागेमध्ये स्थलांतर करावे, तसेच कोल्हापूर येथे सहकार अपील न्यायालय, मुंबई यांचे कायमस्वरूपी बेंचसाठी जागा उपलब्ध करून मिळावी, या मागणीचे निवेदन कोल्हापूर डिस्ट्रिक्ट को-आॅपरेटिव्ह बार असोसिएशनतर्फे देण्यात आले. शिष्टमंडळात अध्यक्ष अ‍ॅड. इंद्रजित चव्हाण, सचिव अ‍ॅड. प्रबोध पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.महिन्याला २ हजार ५०० इतक्या अल्पवेतनात दिवस कंठावे लागत आहेत तसेच आमचे नोकरीत कायम करावे लागतात तितके आमचे दिवस भरले आहे तसेच औद्योगिक न्यायालयाचा कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करावे, असा आदेश झाला आहे. या विरुद्ध बँकेने याचिका दाखल केलेली आहे. त्यामुळे तारखांवर तारखा पडत आहेत तरी यामधून मार्ग काढून न्याय मिळावा या मागणीचे निवेदन कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्यावतीने यावेळी देण्यात आले.यावेळी महानगर जिल्हाध्यक्ष महेश जाधव, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रामभाऊ चव्हाण, जिल्हा संघटनमंत्री बाबा देसाई, जिल्हा सरचिटणीस राहुल चिकोडे, विजय जाधव, नाथाजी पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)विविध विभागांशी संबंधित कोल्हापूरचे प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित आहेत. त्यासंबंधी निवेदने स्वीकारत शुक्रवारी शासकीय विश्रामगृह येथे सहकार व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी लोकांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांशी चर्चा करताना मंत्री पाटील.