शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

कचरा उठाव, भटकी कुत्री आणि ड्रेनेजच्या समस्या सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:25 IST

कोल्हापूर : शहरात कचरा उठावात दिरंगाई, भटक्या कुत्र्यांचा वावर, फुटलेले ड्रेनेज यांसारख्या समस्यांनी नागरिक त्रस्त आहेत. नागरिकांनी वारंवार तक्रार ...

कोल्हापूर : शहरात कचरा उठावात दिरंगाई, भटक्या कुत्र्यांचा वावर, फुटलेले ड्रेनेज यांसारख्या समस्यांनी नागरिक त्रस्त आहेत. नागरिकांनी वारंवार तक्रार करून देखील त्याची दखल घेतली जात नाही. एवढेच काय, तर दिलेल्या निवेदनांवर व स्मरणपत्रावर कार्यवाही होत नसल्याची बाब ‘आप’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी शुक्रवारी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या निदर्शनास आणून दिली.

ताराबाई पार्क येथील निवडणूक कार्यालयात झालेल्या बैठकीत शहरातील भटक्या कुत्र्यांची समस्या, त्यावर महापालिकेचे दुर्लक्ष यावर चर्चा झाली. रामानंदनगर येथील नाल्यातील बांधकामे हटविण्यास महापालिका दिरंगाई करत आहे, असे देसाई यांनी सांगितले. ताराबाई पार्क येथील ड्रेनेजलाईन नवीन टाकण्यासाठी प्रस्ताव मंजूर व्हावा, अशी मागणी युवाध्यक्ष उत्तम पाटील यांनी केली. यावर उपाय म्हणून १२ लाख रुपयांची ड्रेनेज योजना प्रस्तावित असल्याचे जलअभियंता साळुंखे यांनी सांगितले.

बैठकीस नगररचना सहायक संचालक रामचंद्र महाजन, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जलअभियंता अजय साळुंखे, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, उपशहर अभियंता बाबूराव दबडे आदी अधिकारी तर ‘आप’चे संतोष घाटगे, सूरज सुर्वे, गिरीश पाटील, राज कोरगावकर आदी उपस्थित होते.