शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

दानातून समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 23:49 IST

इंद्रजित देशमुख कायिक दानाच्या बाबतीत विचार करू लागलो की, मनात आमच्या दायित्वाबद्दल विचार येतो की, आज कशाचं दान करावं? ...

इंद्रजित देशमुखकायिक दानाच्या बाबतीत विचार करू लागलो की, मनात आमच्या दायित्वाबद्दल विचार येतो की, आज कशाचं दान करावं? आणि किती करावं? कारण दान करायचं झालं तर एकतर आमच्याकडे दान देण्याइतकं परिपूर्णत्व नसतं किंवा जे आहे ते अपूर्ण असल्यास ते देण्याबद्दल संकोच असू शकतो. त्यासाठी आम्ही ऐकलेली गोष्ट आहे. रामायणामध्ये ज्यावेळी प्रभू रामचंद्रांचे सेतूचं बांधकाम सुरू होतं त्यावेळी कपिवर मोठं-मोठाल्या शिळा उचलून पाण्यात टाकत होते. या सगळ्या गडबडीत एक टिटवी या सर्वांसोबत समुद्राकाठची थोडी-थोडी वाळू आपल्या चोचीतून आणून त्या बांधकामाच्या ठिकाणी टाकत होती म्हणजेच या महानकार्याला अनुमोदन देत होती. आपल्या या अनोख्या कृतीने तिने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. हे सगळं पाहून तिला कमी लेखण्याच्या उद्देशाने कुणीतरी तिला विचारलं की, ‘एवढ्या मोठ्या सेतूबंधनाच्या कामात तू टाकत असलेल्या चिमूटभर वाळूने अशी कोणती भर पडणार आहे. त्यापेक्षा तू विनाकारण शरीराला श्रम न देता शांत का बसत नाहीस.’ त्याला टिटवीने दिलेलं उत्तर सर्वांना दानाबद्दलच्या संकुचितता सोडायला लावणारं आहे. ती टिटवी म्हणते, ‘या सेतूबंधनाच्या कामात माझ्या शरीराद्वारे देता येणारं योगदान खूप कमी असेल, माझ्याकडून या बांधकामात अर्पण होणारी वाळूही कमी असेल, पण भविष्यात ज्यावेळी या सेतूबंधनाच्या कामाचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी त्या इतिहासात या सेतूबंधनाच्या कामाद्वारे समाजाचा प्रवास सुखी करण्यासाठी, सोप्या मार्गाची निर्मिती करण्यासाठी झटलेल्या आणि हे एवढं मोठं काम होत असताना निव्वळ पाहत बसलेल्या घटकांची यादी बनवली जाईल. त्यावेळी माझं नाव समाजासाठी जे सामर्थ्य होत ते पुरेपूर वापरून झटू पाहणाऱ्यांच्या यादीत असेल. माझं नाव काय करू आणि कसं करू म्हणून निव्वळ बघत बसणाऱ्यांच्या यादीत कधीच नसेल. माझं योगदान केवढंही असू दे मला त्यात समाधान असेल.’या कथेतील टिटवीने दिलेलं उत्तर खूप परामर्शदायी आहे. आपल्याजवळ जे आहे ते दान देताना असा साहसी भाव आपल्याकडे असायला हवा.याचसाठी महाराज एका ठिकाणी म्हणतात की,‘झाला तरी होवो लौकिक सन्मान।पोटी अभिमान धरू नये।भुकेल्यासी अन्न सत्पात्री ते दान।भावे दिल्याविण राहू नये।।’आपल्याजवळ सन्मान अथवा अपमान या दोन्ही अभिनिवेशात जे आहे ते देण्याची धारकता असायला हवी. मग त्यात कोणताच संकोच असायला नको. संकोच करायचाच असेल तर दातृत्वाचा अहंकार न धरता आपण दान करतो त्यापेक्षा आपल्याला दान देता येण्यासारखं काहीतरी सामर्थ्य निसर्गाने दिलेलं आहे आणि त्या सामर्थ्याच्या अनुषंगाने कुणीतरी कशाच्या तरी माध्यमातून आपल्या दातृत्वाला संधी देण्याचा उपकार आपल्यावर करत आहे ही संधी आपल्या स्वभावातील कोणत्याच वैगुण्याने आपल्या हातून निसटायला नको याचा विचार करायला हवा. आपण करत असलेल्या कायिक, वाचिक आणि मानसिक योगदानाबद्दल निव्वळ स्वकर्तृत्वाचा अहंकार अजिबात असायला नको. कारण ज्या गोष्टींच योगदान आपण देणार आहोत ती गोष्ट आपल्याला निसर्गाने दिलेली असते आणि भरभरून दिलेली असते. अगदी ज्ञानोबारायांच्या भाषेत सांगायचं झालं तर,‘करणे का न करणे।हे अवघे तोचि जाणे।विश्व चळतसे जेणे।।परमात्मेनि’असं आमच्याकडील धारकतेच स्वरूप असतं, पण आम्हाला त्याचा विसर पडल्यामुळे आम्ही त्या धारकतेचा मालकी हक्क स्वत:कडे घेत असतो. त्याचमुळे आम्हाला त्रास होत असतो.याउलट माऊली ज्ञानोबारायांनी म्हटल्याप्रमाणे‘निर्गुणी येणे निराकारी जाणे।सदा माझे राहणे निरंजन।’या वचनाचा विचार करून जे दुसºयांकडून आपल्याला मिळालं आहे ते काही प्रमाणात तिसºयाला द्यायचं आणि त्यातून निर्माण होणारा आनंद मात्र आपण स्वत: उपभोगायचा हा किती सोपा कृतिभाव आहे की, ज्याचा जोपासनेमुळे आम्ही अधिक आनंदी होऊ शकतो. या आनंदासाठी जसं आमच्याकडे दान देण्यासाठी काहीतरी आवश्यक आहे त्यापेक्षा आमच्याकडून दान स्वीकारायला व्यक्ती, परिस्थिती आणि घटनेच्या माध्यमातून आमच्यापुढे कुणीतरी उपलब्ध असणं गरजेचं आहे किंबहुना या प्रक्रियेत दात्यापेक्षा याचकच जास्त महत्त्वाचा आहे. कारण भौतिक जीवनात हे दाते आणि याचक एकमेकांना कृतज्ञभावाने कधीही उपयोगी पडू शकतात. मात्र, आम्ही या दातृत्वाची सुरुवात करायला हवी. ती केली की, आम्ही आमच्याकडून जे देऊ त्याच्या कितीतरी पटीने आम्हाला परत मिळत असते. आम्ही आमच्याकडून जगाला जे देऊ तेच आम्हाला जगाकडून परत मिळत असतं. त्याचसाठी आम्हाला उद्या जे हवं आहे ते आज दान देऊया आणि उद्या संपन्न होऊया.(लेखक : संत साहित्याचे अभ्यासक व परिवर्तनशील वक्ते आहेत)