शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

सोलो, ड्युएट, ग्रुप डान्स स्पर्धेत बालकलाकारांची धमाल...

By admin | Updated: March 4, 2015 23:44 IST

स्कूल डान्स वॉर : ‘लोकमत’ बाल विकास मंच ‘स्टेपअप् युवर टॅलेंट २०१५’अंतर्गत आनंददायी सोहळा

सांगली : ‘लोकमत’ बाल विकास मंच आयोजित ‘स्टेपअप् युवर टॅलेंट २०१५ स्कूल डान्स वॉर’ या स्पर्धेत शहरातील विद्यार्थ्यांनी धमाल केली. सांगलीतील विलिंंग्डन महाविद्यालयातील वेलणकर सभागृहात सुमारे आठ तास रंगलेल्या या ग्रुप डान्स स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील अनेक शाळांनी सहभाग घेतला होता. ‘लोकमत’ बाल विकास मंच व बॅँक आॅफ इंडिया सांगली शाखेतर्फे या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेस डेक्कन एज्युकेशन सोसायटी, सांगली हे सहआयोजक होते. यावेळी बॅँक आॅफ इंडिया सांगली शाखेचे मुख्य व्यवस्थापक श्रीरामा मूर्ती, कर्ज व्यवस्थापक दीपक चव्हाण, प्रताप देशमाने, गावभाग शाखेचे विपणन अधिकारी दिलीप इनामदार, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आर. जे. पाटील उपस्थित होते. सिझलिंग स्टेपअप्चे कोरिओग्राफर संदीप (सॅण्डी) ढमढेरे यांनी स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून काम पाहिले.दुसरी ते चौथी, पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी अशा तीन गटात या स्पर्धा झाल्या. यामध्ये ग्रुप डान्स, ड्युएट डान्स, सोलो डान्स अशा तीन विभागात स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेतून बाल विकास सदस्यांना कला सादर करण्यासाठी ‘लोकमत’ने एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले. यानिमित्ताने बालकलाकारांसोबत पालकही कलाविष्कारात दंग झाले. प्रथम गट- दुसरी ते चौथी (ग्रुप डान्स) गटात अण्णासाहेब डांगे शाळा, आष्टाने प्रथम क्रमांक पटकाविला. यामध्ये आदर्शराज यादव, प्रणव मोहिरे, रितेश निकम, अभय सकरे, प्रवीण जगदाळे, सात्त्विक गावडे, प्रतीक बरकडे, उदयराज देशमुख, विश्वजित शिंदे, प्रणव पाटील, रोहन कार्वेकर, सत्यजित चावरेकर, सत्यजित सापकर, विवेक राडे, यश पवार, शुभम चौगुले, अथर्व सूर्यवंशी हे विद्यार्थी सहभागी होते. द्वितीय क्रमांक कांतिलाल पुरुषोत्तमदास शहा प्रशालेने पटकावला. यामध्ये श्रेयश कुरणे, श्रेणिक बिराजदार, अनुज तेली, ध्रुव पाटील, अथर्व माने, आयुष हणमाने, ओम निकम, श्रेयस कांबळे, श्रावणी कुलकर्णी, पूर्वा सिंहासने, तन्वी बनसोडे, वैभवी निळकंठ, मृण्मयी मगदूम, हर्षदा पाटील, उत्कर्षा सिंहासने हे विद्यार्थी सहभागी होते.तृतीय क्रमांक पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थिनींनी पटकावला. यामध्ये अर्चिता शिपूरकर, मानसी कामत, आर्या चितळे, प्रिया कुलकर्णी, युतिका रुईकर, साची जोशी, मृण्मयी तांबडे, तन्वी मोहोळकर, दीशा कदम, प्राजक्ता गायकवाड, खुशी पटेल, वैष्णवी देसाई, विनया बेदमुथा, सानिया सोनवणे, साक्षी जाधव, आर्शिया इनामदार, ऋतुजा ढेरे, अद्रिका अदित्य, तनीषा चौधरी, झरीन देवजानी या विद्यार्थिनी सहभागी होत्या. दुसरा गट - पाचवी ते सातवी (ग्रुप डान्स) मध्ये अण्णासाहेब डांगे प्रशालेने प्रथम क्रमांक पटकावला. यामध्ये कुणाल आवटी, अमर जवादे, प्रतीक बिराजदार, तेजस चौगुले, सलमान आंबी, सोनाली खोत, मधुरा बाबर, रसिका चौगुले, समृध्दी भिसे, श्रेया लोंढे हे विद्यार्थी सहभागी होते.द्वितीय क्रमांक शिराळा येथील सह्याद्री पब्लिक स्कूलने पटकावला. यामध्ये धनश्री माळी, मानसी नलवडे, दीक्षा शिंदे, ऋद्राणी नलवडे, तन्वी जैन, समृध्दी खुर्द, सिध्दिका खांडेकर, धम्मादिना गायकवाड, सोहम कांबळे, रोहन वारेकर, अमित पाटील, ओंकार भिंगारदेवे, सुशांत पाटील हे विद्यार्थी सहभागी होते.तृतीय क्रमांक विटा येथील प्रोेगेसिव्ह इंग्लिश मिडिअम स्कूलने पटकावला. यामध्ये अभिषेक चव्हाण, शुभम यादव, अरमान शिकलगार, जय कदम, विक्रम चव्हाण, आदित्य सूर्यवंशी, केतन देसाई, प्रियांका काटकर, शिरीन मुलाणी, आकांक्षा सूर्यवंशी, गायत्री देवकर, तनुजा जाधव, सानिका जाधव, महेक मुल्ला हे विद्यार्थी सहभागी होते.तिसरा गट - आठवी ते दहावी (ग्रुप डान्स) यामध्ये पुरोहित कन्या प्रशालेने प्रथम क्रमांक पटकावला. यामध्ये कीर्ती पवार, सबा बागवान, स्मिता अनगोळकर, गौरी नांदणीकर, अपूर्वा कासार, अनुजा माळी, निरंता पवार, प्रणोती देशमुख, वैभवी शहा, विजया अर्जुन सहभागी होत्या.द्वितीय क्रमांक श्रीराम रामदयाळ मालू हायस्कूलने पटकावला. यामध्ये हिमानी मगदूम, प्रणाली वार्इंगडे, स्नेहा पाटील, सिध्दी हनमाने, मैथिली कांबळे, साक्षी भोकरे, इशा पाटील, गौरी कोंडेकर, कावेरी पाटील, विश्वजित चौगुले, सुजाता पाटील, विशाल पाटील, पराग पाटील सहभागी होते. तृतीय क्रमांक दडगे हायस्कूलने पटकावला. यामध्ये सुदिक्षा शिंदे, प्रतीक्षा कांबळे, अक्षता दुधाळ, मृणाली जंगम, तृप्ती माने, ऋतुजा सर्जे, मुस्कान बेटगेरी, प्रियांका बनकर, सानिया भालदार सहभागी होत्या.प्रथम गट - दुसरी ते चौथी (सोलो डान्स) मध्ये तक्षीला स्कूलच्या सिध्दार्थ भोसले याने प्रथम क्रमांक पटकावला.दुसरा गट - पाचवी ते सातवी (सोलो डान्स) मध्ये प्रॅक्टिसिंग स्कूलच्या सानिका पवार हिने प्रथम क्रमांक पटकावला. ए. बी. पाटील स्कूलची आदिती यमगर हिने द्वितीय क्रमांक पटकावला. तिसरा गट - आठवी ते दहावी (सोलो डान्स) मध्ये ग. रा. पुरोहित कन्या प्रशालेची कीर्ती पवार हिने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक श्रीराम रामदयाळ मालू हायस्कूलची अनुजा काटे हिने पटकावला. प्रथम गट - दुसरी ते चौथी (ड्युएट डान्स) मध्ये मॉडर्न स्कूलचा राजवर्धन घाडगे व मृण्मयी सावंत यांनी प्रथम क्रमांक पटकावला. दुसरा गट - पाचवी ते सातवी (ड्युएट डान्स) मध्ये ग. रा. पुरोहित प्रशालेची सानिका कुलकर्णी व इंदिरा बाबगोंडा पाटील प्रशालेचा ओंकार माळी यांनी प्रथम क्रमांक पटकावला. (प्रतिनिधी)