शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सैनिक टाकळीत मगर पकडली

By admin | Updated: November 18, 2014 23:32 IST

कृष्णा नदीत जेरबंद : सुमारे सात फूट लांब; गवत कापणाऱ्या शेतकऱ्यांना आढळली

कुरुंदवाड : सैनिक टाकळी (ता. शिरोळ) येथे कृष्णा नदीकाठावरील कुरणात सुमारे सात फूट लांबीची मगर शेतकऱ्यांनी अत्यंत धाडसाने जेरबंद केली. सकाळी दहा वाजता मगरीला दोरखंडाने बांधून ग्रामपंचायतीजवळ आणून बांधून ठेवले. सायंकाळी शिरोळ वनविभागाचे अधिकारी मगरीला घेऊन गेले. दरम्यान, ग्रामस्थांनी मगर पकडल्याचे समजताच तिला पाहण्यासाठी ग्रामपंचायतीसमोर अबालवृद्धांसह ग्रामस्थांनी गर्दी केली होती.कृष्णा नदीपात्रात मगर असल्याचे अनेक नागरिकांनी पाहिले होते. त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांतून भीती व्यक्त होत होती. आज, मंगळवारी सकाळी टाकळी-खिद्रापूर रस्त्यावरील नदीकाठच्या कुरणामध्ये गवत कापण्यासाठी जयसिंग पाटील गेले होते. गवत कापत असताना गवतामध्ये मगर असल्याचे दिसताच त्यांनी आसपासच्या शेतकऱ्यांना माहिती दिली. यावेळी विद्याधर पाटील, संभाजी गायकवाड, अनिल पाटील, अमर पाटील, संजय गायकवाड हे दोरखंडासह अन्य साहित्य घेऊन आले. त्यांनी अत्यंत धाडसाने प्रथम तोंडाला व नंतर शेपटीला दोरखंडाने आवळून बांधून मगरीला ग्रामपंचायतीसमोर आणून ठेवले व शिरोळ येथील वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळविले.नदीपात्रात मगर असल्याचे अनेकांनी पाहिले होते. प्रत्यक्षात ती सापडली असल्याबाबत नागरिकांचा विश्वास बसत नव्हता. दरम्यान, मगरीला ग्रामपंचायतीसमोर आणून बांधल्याने व वनविभागाचे अधिकारी लवकर न आल्याने मगरीला ‘याची देही याची डोळा’ पाहण्यासाठी टाकळीसह परिसरातील नागरिकांसह अबालवृद्धांनी गर्दी केली होती. सायंकाळी वनविभागाचे अधिकारी आर. बी. पताडे व आर. बी. मोरे मगरीला चांदोली अभयारण्यात सोडण्यासाठी घेऊन गेले.शिरोळ तालुक्यातील नद्यांमध्ये मगरीशिरोळ तालुक्यात कृष्णा, पंचगंगा, वारणा नदीपात्रात मगरीचा वावर अनेकांनी पाहिला होता. मात्र, प्रत्यक्षात ती सापडत नसल्याने नागरिकांचा विश्वास बसत नव्हता. मात्र, गणेशवाडी, टाकळी येथे मगरीला पकडल्याने तालुक्यातील तिच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब झाल्याने नदीकाठच्या शेतकऱ्यांतून भीती व्यक्त होत आहे. वनविभागाने पथक नेमून मगरींचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.