शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

सोलर सिटी व वाय-फाय सेवा मोफत

By admin | Updated: March 3, 2017 01:08 IST

इचलकरंजीसाठी पुनर्प्रस्ताव : हाळवणकरांची माहिती, सहा महिन्यांत आधुनिक रुग्णसेवा

इचलकरंजी : इचलकरंजी शहर सोलर सिटी करण्याबरोबरच काही प्रमुख चौकांमध्ये वाय-फाय सेवा मोफत उपलब्ध करून देण्याचा पुनर्प्रस्ताव नगरपालिकेने शासनाकडे द्यावा. शासनाच्या नगरविकास खात्याकडून दोन्ही प्रस्ताव मंजूर करून घेऊन त्याची उभारणी करण्यात येईल, अशी माहिती आमदार सुरेश हाळवणकर यांनी पत्रकारांना दिली.नगरपालिकेमध्ये कार्यक्रमासाठी आलेले आमदार हाळवणकर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा अ‍ॅड. अलका स्वामी, मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ, अतिरिक्त मुख्याधिकारी डॉ. पवन म्हेत्रे, जलअभियंता सुरेश कमळे, नगरअभियंता बापूसाहेब चौधरी, सभापती लतीफ गैबान, नेहा हुक्किरे, सारिका धुत्रे, सोनाली अनुसे, पक्षप्रतोद तानाजी पोवार, अजित जाधव, आदी उपस्थित होते. यापूर्वी सोलर सिटीचा प्रस्ताव नगरपालिकेकडे देण्यात आला होता. मात्र, न झालेल्या प्रस्तावामध्ये घोटाळा झाला, असा विरोधकांनी बिनबुडाचा आरोप करून त्याला प्रचंड विरोध केला. त्यामुळे शासनाने हा प्रस्ताव रद्द केला.इचलकरंजीमधील प्रमुख चौकांत वाय-फाय सेवा देण्यासाठी शासनाकडे दिलेला यापूर्वीचा प्रस्ताव काही तांत्रिक त्रुटींमुळे रद्द झाला. मात्र, इस्लामपूर नगरपरिषदेने तयार केलेल्या प्रस्तावाचा अभ्यास करून वाय-फाय सेवा देण्याचा प्रस्ताव नगरपालिकेने पुन्हा शासनाला द्यावा, असे सूचित करून आमदार हाळवणकर म्हणाले, शहरामध्ये विविध अशा नऊ ठिकाणी आमदार निधीतून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची यंत्रणा उभी केली आहे. याशिवाय आणखीन काही प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे उभे करण्याचा प्रस्ताव पालिकेने शासनाला द्यावा.आयजीएम दवाखाना हस्तांतरित करून घेण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. मार्च महिनाअखेर दवाखान्याकडे असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन नगरपालिकेने द्यावयाचे असून, दवाखान्यासाठी दहा कोटी रुपये निधीची शासनाने तरतूद केली आहे. या निधीतून अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पुढील वेतन दिले जाईल. त्याचप्रमाणे दवाखान्याकडे आवश्यक असलेला २२५ अधिकारी व कर्मचारी वर्ग भरून घेतला जाईल. तसेच दवाखान्याकडे अत्याधुनिक असलेली सर्व प्रकारची यंत्रसामग्री स्थापित झाल्यानंतर शासनाचा हा सामान्य दवाखाना (जनरल हॉस्पिटल) इचलकरंजी शहर व परिसरातील नागरिकांना अत्यंत आधुनिक व चांगली आरोग्य सेवा पुरविल. (प्रतिनिधी)आता कृष्णा नदीतूनच पाणीपुरवठापंचगंगा नदीचे पाणी दूषित झाल्यामुळे नजीकच्या एक-दोन दिवसांत या नदीतून नळ पाणीपुरवठ्यासाठी होणारा उपसा बंद केला जाईल. त्यामुळे नजीकच्या उन्हाळ्याच्या कालावधीत कृष्णा नदीतील शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी नदीमध्ये शहरास आवश्यक असलेली पाण्याची पातळी व साठा उपलब्ध करून देण्याकरिता पाटबंधारे खात्याला कळविण्यात आले आहे. तांत्रिक दुरुस्तीचे अपवाद वगळता शहरास सातत्याने दोन दिवसांतून एक वेळ पाणीपुरवठा होईल. त्याचबरोबर शहरातील कूपनलिकांवर टायमर बसवून नागरिकांना सकाळ-संध्याकाळ योग्य वेळी पाणीपुरवठा केला जाईल. याशिवाय आणखीन १७ कूपनलिकांवर सबमर्सिबल पंप बसवून त्याचे पाणीही नागरिकांना उपलब्ध करून दिले जाणार आहे.