सतीश नांगरे-लोकमत न्यूज नेटवर्क
: शित्तुर-वारुण : संवेदनशीलता जपणारी माणसं ही समाजाची सकारात्मक बाजू आहे. गोरगरीब, वंचित समाजासाठी राबणाऱ्या व्यक्ती ह्या नेहमीच सर्वश्रेष्ठ असतात, असे प्रतिपादन माजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजीत देशमुख यांनी केले. शित्तुर वारुण (ता.शाहूवाडी) येथे निराधार आजींना घर प्रदान व दिव्यांग मुलांसाठी जीवन आधार सुविधेच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील होते.
यावेळी अब्दुललाट येथील विद्योदय संस्था व खेडे येथील सेवा फाउंडेशनच्या वतीने लोकवर्गणीतून निराधार बाळाबाई पाटील या वृद्ध महिलेस घर तसेच शैक्षणिक व्यासपीठाच्या पुढाकाराने अचानक अपंगत्व आलेल्या निखिल व कुणाल या दोन मुलांच्या जीवन आधार सुविधेचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी सावली फाउंडेशन कोल्हापूरचे किशोर देशपांडे यांनी दोन्ही मुलांच्या वैद्यकीय उपचारासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले, तर युवराज पाटील यांनी शैक्षणिक व्यासपीठाच्या उपक्रमासाठी भरघोस मदत देण्याचे जाहीर केले.
यावेळी विनायक हिरवे, विनायक माळी, गोविंद देसाई, भरतेश कळंत्रे, विलास तोळसणकर यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमासाठी अशोक पाटील, विजय गुरव, संजय जगताप, वसंत पाटील, सदाशिव कांबळे, बाबा साळोखे, दीपक वडाम, तानाजी वाघमोडे, भगवान पाटील, वैशाली हिरवे, जयश्री मगदूम, राजू पवार, अशोक पाटील, योगेश दळवी, तातोबा पाटील, सुनीता गुरव, विठ्ठल पाटील, सारशा माळी आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन एम. आर. पाटील यांनी, तर आभार संभाजी लोहार यांनी मानले.
२३ शित्तुर वारुण प्रोग्राम
फोटो :
शित्तुर वारुण (ता. शाहूवाडी) येथे निराधार आजींना घर प्रदान व दिव्यांग मुलांसाठी जीवन आधार सुविधेच्या उद्घाटनप्रसंगी मा. इंद्रजित देशमुख व मान्यवर.