शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

शाहिरीतून समाजप्रबोधन

By admin | Updated: February 15, 2016 01:08 IST

समाजकल्याणचा उपक्रम : समता दिंडीचे कोल्हापुरात आगमन

कोल्हापूर : ‘पाणी वाचवा, आरोग्य, पर्यावरण रक्षण, लेक वाचवा’ आदी विषयांबाबत शाहिरी पोवाडा कलामंचचे शाहीर रंगराव पाटील यांनी रविवारी बिंदू चौकात प्रबोधन केले. निमित्त होते समता दिंडीचे (चित्ररथ) आगमन.समाजकल्याण विभागातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त राज्यात समता दिंडीचे आयोजन केले आहे. कोल्हापुरात रविवारी सकाळी समता दिंडीचे बिंदू चौकात आगमन झाले. याठिकाणी समाजकल्याण विभागातर्फे शाहीर पाटील यांचा कार्यक्रम घेण्यात आला. त्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या हस्ते झाले. यावेळी समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विजय गायकवाड, वरिष्ठ समाजकल्याण निरीक्षक संतोष चिकणे, ‘बार्टी’चे प्रकल्पाधिकारी गणेश सव्वाखंडे, अ‍ॅड. पंडितराव सडोलीकर, प्रा. विश्वासराव देशमुख, बाळासाहेब भोसले, आदींसह समतादूत उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात शाहीर पाटील यांनी बुद्धवंदनेने केली. यानंतर त्यांनी राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट, त्यांच्या सामाजिक कार्यावरील पोवाडे सादर केले तसेच संविधानाचे महत्त्व पटवून देण्यासह त्यांनी पाणी वाचवा, लेक वाचवा आणि समता, न्याय आदी विषयांबाबत प्रबोधन केले. शाहीर पाटील यांना शाहीर बाळासाहेब खांडेकर, सखाराम चौगुले, कृष्णात पाटील, लक्ष्मण पाटील, बाळू पाटील, संजय गुरव, रमेश कांबळे, गौतम कांबळे यांनी साथ दिली. रणजित कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)