शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

भांडवलशाहीला समाजवाद हाच सक्षम पर्याय : मिश्रा-

By admin | Updated: December 12, 2014 23:38 IST

-अवि पानसरे व्याख्यानमाला

कोल्हापूर : व्यवसायातून मिळालेल्या नफ्यातूनच या देशातील भांडवलशाहीने नवतंत्रज्ञानाचा वापर करीत उत्पादकतेचा विकास केला़ या उत्पादक विकासाच्या जोरावरच ही भांडवलशाही दीर्घकाळ टिकली़ तंत्रज्ञानाने रोजगार कमी केला़; पण तंत्रज्ञानाची मजल रोबोपर्यंत आल्यामुळे तंत्रज्ञान हे अंतिम सीमेवर आले आहे़ अशा परिस्थितीत भांडवलशाहीला समाजवाद हाच सक्षम पर्याय आहे, असे प्रतिपादन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे केंद्रीय सदस्य यु़ एऩ मिश्रा यांनी केले़ श्रमिक प्रतिष्ठानच्यावतीने येथील शाहू स्मारक भवनमध्ये आयोजित कॉम्रेड अवि पानसरे व्याख्यानमालेचा समारोप आज, शुक्रवारी झाला़ याप्रसंगी ते बोलत होते़ ‘लोकशाही आणि समाजवाद’ हा विषय होता़ अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंदराव पानसरे होते़ मिश्रा म्हणाले, लोकशाहीच्या समतेच्या कल्याणकारी ध्येयाकडे जाण्यासाठी समाजवाद ही एक प्रक्रिया आहे़; पण लोकशाही आणि समाजवाद ही वेगवेगळे अंगे आहेत, असा चुकीचा प्रचार काही घटक करीत आहेत़ विकासाच्या नावाखाली लोकशाहीमध्ये विपरीत स्थिती निर्माण झाली आहे़ हे बदलण्यासाठी लोकशाहीवर विश्वास असलेल्या घटकांनी एकत्र येण्याची गरज आहे़ इथल्या राजकीय व्यवस्थेच्या मदतीने भांडवलदारांनी प्रचंड नफा मिळविला़ स्वातंत्र्योत्तर काळानंतरही राजकीय व्यवस्था आणि भांडवलदार अशी दोन सरकारे या देशात एकमेकांच्या संगनमताने समांतरपणे चालली आहेत़ त्यामुळे ना कॉँग्रेस स्विस बँकेतील काळा पैसा आणू शकली, ना भाजप़़़ महागाईबाबत नवीन सरकारने हात वर केले आहेत. सर्वांना समान न्याय देणाऱ्या समाजवादी मार्गाने समाजविकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी आपण सज्ज राहिले पाहिजे, असे आवाहनही मिश्रा यांनी केले़ कॉम्रेड गोविंद पानसरे म्हणाले, राज्यघटनेला समता अभिप्रेत आहे़; पण विषमतेचे तत्त्वज्ञान जोपासणाऱ्यांचे सरकार आता आलेले आहे़ त्यामुळे देशात व राज्यात स्वातंत्र्यानंतर कधीही नसलेली विषमतावादी विचारांची पेरणी करणारी परिस्थिती निर्माण झाली आहे़ विषमतावादी तत्त्वज्ञानामुळे घटनेलाच धोका निर्माण झाला आहे़ अरुण पाटील यांनी प्रास्ताविक केले़