शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक न्याय विभागाचे अन्यायी ‘समाजकार्य’

By admin | Updated: June 26, 2014 00:42 IST

निवृत्तिवेतन नाही : सात जुलैपासून कऱ्हाडला उपोषण

विश्वास पाटील ल्ल कोल्हापूरराज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून राज्यभरातील सुमारे पन्नास समाजकार्य महाविद्यालयांतील बाराशे प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर गेली अनेक वर्षे अन्याय सुरू आहे. या लोकांना शासन निवृत्तिवेतन व उपदानच द्यायला तयार नाही. त्याविरोधात हे सगळे कर्मचारी येत्या सात जुलैपासून कराडला यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी बेमुदत उपोषणास बसणार आहेत. गोरगरीब व वंचित समाजघटकांना न्याय मिळवून देणाऱ्या लोकांनाच स्वत:वरील अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरावे लागत आहे.आम्ही आयुष्यभर देवदासींना निवृत्तिवेतन लागू करावे यासाठी झगडलो. त्यांना ते लागू झाले, परंतु आम्हीच त्यापासून वंचित असल्याने शासनाने सन्मान म्हणून दिलेला दलितमित्र पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती डॉ. साधना झाडबुके यांनी दिली आहे. राज्यात पन्नास समाजकार्य महाविद्यालये सुरू आहेत. त्यामध्ये तीन हजारांवर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शिक्षणाकडे मुलामुलींचा प्रचंड ओढा आहे. प्रवेश क्षमतेपेक्षा तिप्पट अर्ज येतात. ही महाविद्यालये राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारित येतात. हा व्यावसायिक पदव्युत्तर अभ्यासक्रम असूनही त्यास शासन अनुदान देते. त्यामुळे दोन वर्षाच्या पदव्युत्तर पदवीचे शुल्क वर्षाला ८५०० रुपयेच आहे. मराठवाडा-विदर्भामध्ये तरी हे शुल्क त्याहून कमी आहे. या महाविद्यालयांतील कर्मचाऱ्यांचा पगार शासनच करते. उच्च शिक्षण विभागाकडील प्राध्यापक व हे प्राध्यापक यांचा पगार व पदोन्नतीची प्रक्रियाही सारखीच आहे. परंतु आर्थिक ताण पडेल असे कारण पुढे करून शासन सापत्नभावाची वागणूक देते. या विरोधात महाराष्ट्र असोसिएशन आॅफ सोशल वर्क एज्युकेटर्स (मास्वे) संघटनेने उच्च न्यायालयात दावा दाखल केला. न्यायालयाने १७ जानेवारी २०१४ ला (रिट पिटीशन क्रमांक ७९५१/२०११)व रिट पिटीशन क्रमांक ४८०२/२०१० (संदर्भ क्रमांक १४) अन्वये निर्णय देताना समाजकार्य महाविद्यालयांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवृत्तिवेतन व उपदान योजना लागू करण्याचे आदेश दिले, परंतु त्याचीही अंमलबजावणी अद्याप झालेली नाही.संघटनेचे राज्याध्यक्ष अमरावतीचे प्रा.अंबादास मोहिते यांच्या नेतृत्वाखाली त्या विरोधात गेली अनेक वर्षे विविध पातळ््यांवर संघर्ष सुरू असूनही शासन त्याकडे लक्ष द्यायला तयार नाही.