शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

समानता व्यापक केल्यास सामाजिक समरसता वाढेल

By admin | Updated: March 8, 2016 00:51 IST

शेखर चरेगावकर : जातीभेदाचे उच्चाटन करण्यात अपयश आल्याची खंत

इस्लामपूर : कुटुंबातील समानता सामाजिक पातळीवर अधिक व्यापक केल्यास समरसता वाढेल. जातीभेद हा कचरा आहे, तो टाकून दिला पाहिजे, असे स्वामी विवेकानंद म्हणायचे. मात्र तरीही आपल्याला जातीभेदाचे उच्चाटन करण्यात अपयश आल्याची खंत राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी व्यक्त केली.येथील सार्वजनिक तालुका वाचनालयाच्या वसंत व्याख्यानमालेत चरेगावकर यांनी ‘समाजव्यवस्थेतील समरसता’ या विषयावर दुसरे पुष्प गुंफले, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील अध्यक्षस्थानी होते. चरेगावकर म्हणाले, समरसता शब्दाला आपल्याकडे जातीय वास देण्यात येतो. उद्योग-व्यवसायावर आधारित जात रचना असल्याने त्याला गहिरेपण येते. प्रत्येक धर्माचे अधिष्ठान एकसमान आहे. त्यामुळे समरसतेला जाती-पक्षाच्या जोखडातून बाहेर काढले पाहिजे. विषमतेला थारा न देता आचरण आणि कृतीमधून समरसता दिसली पाहिजे. राष्ट्राला बलशाली करण्यासाठी समाजकारण, राजकारण, अर्थकारण आणि व्यापार-उदीमही सचोटीनेच व्हायला हवा. समाजातील सर्व व्यवहार सरळ आणि सचोटीने झाल्यास समरसता भक्कम होईल.दिलीप पाटील म्हणाले, सहकारात विश्वस्त म्हणून काम करणे गरजेचे आहे. जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रगतीच्या वाटेवर आणण्याचा प्रयत्न आहे. आर्थिक दुर्बल शेतकऱ्यांच्या हुशार मुलांना परदेशातील शिक्षणासाठी ३५ लाखांपर्यंत अर्थसाहाय्य देणार आहोत. जिल्हा बँकेचे रुपे डेबीट कार्ड घेऊन शेतकरी आता जगाच्या पाठीवर कुठेही व्यवहार करू शकतो. सहकार चळवळ ही ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे, ती वाढली पाहिजे.दीनानाथ लाड यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रकाश रसाळ यांनी सूत्रसंचालन केले. अमित पानस्कर यांनी आभार मानले. यावेळी प्रा. शामराव पाटील, अ‍ॅड. बी. डी. पाटील, अमोल गुरव, संग्रामसिंह पाटील, डॉ. जवाहर शहा, डॉ. सई मंद्रुपकर, गजानन पाटील, सुभाषराव जाधव, सुभाष बाबर उपस्थित होते. (वार्ताहर) वसंतव्याख्यानमाला