शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमाच्या दिवसाला ‘सामाजिक’ किनार

By admin | Updated: February 15, 2016 01:10 IST

विविध संघटनांचा सहभाग : रविवारच्या सुटीने ‘व्हॅलेंटाईन डे’ला संमिश्र प्रतिसाद

कोल्हापूर : ‘कोठेतरी जाऊ शीघ्र विमानी, अज्ञात ठिकाणी, स्वातंत्र्य जिथे, शांती जिथे, प्रेम इमानी, तेथे चल राणी...’ जणू असाच काहीसा भाव मनी घेऊन रविवार हा सुटीचा दिवस असल्याने शहरातील अनेक प्रेमीयुगुलांनी व्हॅलेंटाईन डे शहराबाहेरील, उपनगरांतील उद्यानांत, हॉटेलांत एकमेकांना भेटून फुले देत साजरा केला; तर काहींनी सामाजिक बांधीलकी जपत विविध उपक्रम राबविले. यंदाचा ‘व्हॅलेंटाईन डे’ नेमका रविवारी आल्याने महाविद्यालयीन परिसरात शुकशुकाट पसरला होता. त्यामुळे संमिश्र स्थितीतच व्हॅलेंटाईन डे साजरा झाला. तरुणाईच्या उत्साहाने रोज वर्दळ असलेल्या कट्ट्यांवर आज तुरळक वर्दळ होती. न्यू कॉलेजच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांना ओळखपत्राशिवाय प्रवेश दिला जात नव्हता. परीक्षा जवळ आल्याने अभ्यासाच्या तणावामुळे विद्यार्थ्यांमध्ये व्हॅलेंटाईनचा जोश दिसला नाही. सामाजिक भान जपत जनकल्याण सामाजिक संस्थेच्या वतीने ‘व्हॅलेंटाईन डे’चे औचित्य साधून कुष्ठरोग्यांना चादरीचे वाटप करून गरिबांना प्रेमाची ऊब दिली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष उदयसिंह पाटील, संगीता पाटील, सागर पाटील, प्रा. पी. जी. अंगज, प्रकाश पाटील, बाळासाहेब कांबळे, अजितकुमार पाटील, सौरभ कांबळे, मारुती पाटील, ओंकार पाटील, आदी उपस्थित होते. सायबर महाविद्यालयाच्या दिनकरराव शिंदे समाजकार्य विभागाच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या आवारात वृक्षारोपण केले. तसेच किर्लोस्कर आॅईल इंजिनमधील कर्मचाऱ्यांच्या वतीने बालकल्याण संकुलातील अनाथ मुलांना वॉटर प्युरिफायर व टॉवेल भेट देऊन ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करण्यात आला. दरम्यान, शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर हिंदू जनजागृती समितीच्या वतीने ‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे गैरप्रकार रोखून १४ फेबु्रवारी हा दिवस शाळा, महाविद्यालयांमध्ये ‘मातृ-पितृ दिन’ म्हणून साजरा केला जावा यासाठी आंदोलन करण्यात आले. तसेच स्वराज्य सामाजिक संस्थेच्या वतीने शिवाजी चौकात निदर्शने केली.ंसोशल मीडियात उत्साहाला उधाण दिवसभर व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक, मेसेज अशा माध्यमांतून शुभेच्छापत्रे पाठविणे, मेसेज पाठविणे, फेसबुकवर प्रेम कविता, सेल्फी पोस्ट करणे, लोकेशन स्टेटस अपडेट करणे अशा प्रकारांना ऊत आला होता. एकमेकांना टॅग करीत, शुभेच्छा देत सोशल मीडियावर व्हॅलेंटाईन डे उत्साहात साजरा आला. गुलाबाच्या किमतीत वाढव्हॅलेंटाईन डेनिमित्त गुलाबांना रविवारी विशेष मागणी होती. आकर्षकरीत्या सजविलेल्या फुलांनी दुकाने सजली होती. फुलांची विक्री वाढणार हे गृहीत धरून विक्रेत्यांनी पाच रुपयांना असणारे गुलाब चक्क पंधरा ते वीस रुपयांना विकत चांगलाच व्यवसाय केला.