शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कोगेत तरू णाने जपली सामाजिक बांधिलकी

By admin | Updated: December 16, 2014 00:16 IST

ग्रामस्थांची साथ : अंत्यविधीसाठी मोफत सरण

शिवराज लोंढे - सावरवाडी -गोरगरिबांना महागाईच्या काळात मरणही महाग झाले असताना जनसेवेच्या भावनेतून अंत्यविधीसाठी मोफत सरण देण्याचा उपक्रम कोगे (ता. करवीर) गावात ग्रामपंचायत, तरुण मंडळे व ज्योतिर्लिंग विकास सेवा संस्था यांच्या पाठबळावर सरदार शामराव पाटील हा युवक स्वखर्चाने राबवत आहे. सलग चार वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे.कोगे गावात २००९ साली एका मयत व्यक्तीला अंत्यविधीसाठी जळण न मिळाल्याने दोन तास ग्रामस्थ थांबले. या घटनेने व्यथित झालेल्या सरदार शामराव पाटील याने गावात अंत्यविधीसाठी लागणारे सरण मोफत आणि स्वखर्चाने देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला प्रारंभी काही लोकांचा विरोध होता; पण नंतर ग्रामस्थांनी एक विधायक उपक्रम म्हणून याला साथ देण्यास सुरूवात केली. तरुणवर्गाच्या पाठबळामुळे आणि ग्रामपंचायत, ज्योतिर्लिंग विकास सेवा संस्था, यशवंतराव अतिग्रे पाणीपुरवठा संस्था, सर्व दूध संस्था, पतसंस्था, शिवशाहू विचारमंच, मित्रप्रेम स्पोर्टस् यांच्या सहकार्यामुळे या उपक्रमाला चालना मिळाली. ज्योतिर्लिंग विकास सेवा संस्थेने एक रिकामा हॉल शेणी व लाकडे जमा करण्यासाठी दिल्या. या पे्ररणेतून सरदार पाटील यांच्या अंत्यविधीसाठी मोफत सरण उपक्रमाला बळ मिळाले. होळी सणानिमित्त गावात पाचशेणी होळीकरिता देऊन बाकीच्या शेणी ग्रामपंचायतीकडे दान करतात. ग्रामपंचायतीतर्फे उत्सव व महाप्रसादावेळी शिल्लक राहिलेली जळाऊ लाकडे ग्रामपंचायत लिलाव घेऊन अंत्यविधीच्या उपक्रमाला दान देतात.सरदार पाटील गावातील महिलांनी लावलेल्या शेणी स्वत: विकत घेऊन ते हजेरीने माणसांकडून हॉलमध्ये शेणी रचतात. हॉलमध्ये सुमारे ३५ हजार शेणी, पाच टन लाकडे साहित्य आहे. ग्रामपंचायतीमार्फत हा शेणी दान उपक्रम घेऊन शेणी लाकडे अंत्यविधीसाठी दान करतात.वाढत्या महागाईच्या काळात गोरगरीब लोकांच्या मयत व्यक्तींना सरणासाठी जळण मिळणे कठीण होते. एका प्रसंगातून मनाला खूप वेदना झाल्या आणि मनात विचार केला की, अंत्यविधीसाठी गावात मोफत सरण हा उपक्रम राबवण्याचा. गेल्या चार वर्षांपासून हा उपक्रम राबवत आहे. यासाठी ग्रामपंचायत, सेवा संस्था, तरुण मंडळे यांनी मला साथ दिली. एक पुण्याईचे काम म्हणून मी ही चळवळ सुरू केली आहे.- सरदार शामराव पाटील, शेतकरी, कोगे.