शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
5
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
6
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
7
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
8
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
9
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
10
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
11
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
12
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
13
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
14
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
15
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
16
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
17
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
18
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
19
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
20
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!

रक्षाबंधनाच्या सणाने सामाजिक वीण घट्ट

By admin | Updated: August 19, 2016 00:36 IST

शहरात अपूर्व उत्साह : संस्था, संघटना, शाळा, महाविद्यालयांचा सहभाग

कोल्हापूर : भावा-बहिणीच्या नात्याचा बंध चिडीला आणणारी टिंगल, लवंगीसारखी फुटणारी दीड मिनिटांची भांडणे, एखादी टप्पल आणि डबडबलेल्या डोळ्यांनी टाकलेला मायेचा कटाक्ष यांनी बांधलेला असतो. या सगळ्या भावनांचा बंध बहिणीने राखीच्या रूपाने भावाच्या मनगटावर बांधला आणि भावाने तिला रक्षणाची ग्वाही देत रक्षाबंधन हा सण गुरुवारी साजरा करण्यात आला. बहीण-भावाच्या नात्याला प्रेम, भांडण, रुसवे-फुगवे असे भावभावनांचे पदर असतात. प्रेमाचा तो बंध असतो. ‘राखीच्या या बंधनास जपावे निरामय भावनेने, जसे जपले हळुवार मुक्ताई-ज्ञानेश्वराने’ असे म्हणत बालपणापासूनची साथ प्रेमाच्या नात्याची वीण अधिक घट्ट करणारा हा सण कोल्हापूरकरांनी उत्साहात साजरा केला. कुर्ता घालून व डोक्यावर टोपी ठेवून पाटावर बसलेल्या भावाला बहिणीने राखी बांधली, त्याचे औक्षण केले आणि भावाने तिच्या सदैव पाठीशी राहण्याची हमी देत, आकर्षक भेटवस्तू देऊन तिला खुष केले. अनेकविध सौंदर्याने नटलेल्या या राख्या हातावर मोठ्या अभिमानाने बांधून घेऊन मिरवतच भाऊ घरातून बाहेर पडले. लहान मुलांपासून घरातील कर्ते पुरुष ते वृद्ध आजोबांपर्यंत प्रत्येकाच्या मनगटावरची राखी खुलून दिसत होती. बहीण-भावाच्या रक्ताच्या नात्याबरोबरच मानलेल्या नात्यांनाही मोलाचे स्थान आहे. त्यामुळे शहरातील नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंडसह विविध संस्थांतर्फे रक्षाबंधन साजरा करण्यात आले. यावेळी अ‍ॅड. धनंजय पठाडे, डॉ. मुरलीधर डोंगरे, प्रमिला जरग, द्वारकानाथ जरग उपस्थित होते. (प्रतिनिधी)बंदी बाधवांना बहिणीची माया...!कोल्हापूर : बिंदू चौकातील उपकारागृहातील बंदीजनांना शहाजी लॉ कॉलेजच्या विद्यार्थिनींनी राखी बांधून बहिणीची माया दिली. जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाच्या पुढाकाराने हा कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी जिल्हा न्यायाधीश आर. एस. निंबाळकर होत्या. यावेळी वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश एस. एम. टाकळीकर, मुख्य न्यायदंडाधिकारी व्ही. एस. देशमुख, जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव यू. जे. मोरे, प्रा. डॉ. सविता रासम, पल्लवी कोरगावकर, अ‍ॅड. के. आर. खटावकर, अ‍ॅड. निखिल इनामदार उपस्थित होते. यावेळी विद्यार्थिनींनी १२९ बंदीबांधव व २२ तुरुंग कर्मचाऱ्यांना राख्या बांधल्या. बंदीबांधवांतर्फे प्रा. कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मुख्य न्यायदंडाधिकारी देशमुख, जिल्हा न्यायाधीश निंबाळकर, सचिव मोरे तुरुंगाधिकारी प्रशांत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. अ‍ॅड. एस. व्ही. मुक्तामठ यांनी आभार मानले.भागीरथी संस्थेने साजरे केले अनोखे रक्षाबंधनकोल्हापूर : भागीरथी महिला संस्थेने लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यातील पोलिसांना तसेच बंदीजनांना राख्या बांधल्या. यावेळी पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, साहाय्यक पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलिस निरीक्षक युवराज आठरे, डी. के. पवार, संस्थेच्या अश्विनी वास्कर, प्रिया चिवटे, प्रिती खोत, चंद्रकला सिद्धनेर्ली, संध्या साळी, सुनीता जोशी उपस्थित होत्या. यावेळी कारागृह अधीक्षक शरद शेळके, तुरुंग अधिकारी चंद्रकांत आवळे, हरिश्चंद्र जाधव, आर. एस. जाधव उपस्थित होते. प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयाच्यावतीनेही कैद्यांना राखी बांधण्यात आली.+]बहिणींसोबत सेल्फी रक्षाबंधन सण सोशल मीडियावरही तितक्याच उत्साहाने साजरा झाला. दिवसभर व्हॉट्स अ‍ॅपवर बहीण-भावाच्या नात्याची महती सांगणारे संदेश फिरत होते. अनेक ग्रुपवर भावांनी बहिणींसोबतची सेल्फी शेअर केली. काहीजणांनी राखी बांधतानाचे छायाचित्र पोस्ट केले. याशिवाय ‘बहीण हवी असेल तर स्त्री-भू्रण हत्या रोखा, मुली वाचवा’ असा सामाजिक संदेशही देण्यात आला. सखी संघटनेत रक्षाबंधनाचा कार्यक्रमकोल्हापूर : वारांगनांसाठी कार्यरत असलेल्या सखींनी रक्षाबंधनानिमित्त गुरुवारी आपल्या भावांना धागा बांधला. लक्ष्मीपुरीतील सखी संघटनेच्या कार्यालयात सायंकाळी हा कार्यक्रम झाला. स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या सखींकडून राखी बांधून घेतली.‘रेशीम धागा गुंतला धागा, आठवण येते भाऊराया’ हे ब्रीदवाक्य या सखींनी तयार केले होते. सखी संघटनेच्या अध्यक्षा शारदा यादव यांच्या नेतृत्वाखाली रक्षाबंधन साजरे करण्यात आले. स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा युवा अध्यक्ष राजू वायदंडे, शहराध्यक्ष धनाजी सकटे, युवा उपाध्यक्ष प्रवीण आजगेकर यांच्या हातात या वारांगनांनी राखी बांधली. या भावांनी भारतीय संविधानाची प्रत या सखींना भेट म्हणून दिली. सुमारे तासभर हा कार्यक्रम झाला. यावेळी संगीता पाटील, जयश्री शीतलगीरी यांच्यासह वारांगना उपस्थित होत्या.बालकल्याण संकुलात उत्साहमंगळवार पेठेतील बालकल्याण संकुलात रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. या कार्यक्रमात संस्थेतील कन्या निरीक्षणगृह, कन्या बालगृह, महिला आधारगृह या विभागांतील मुलींनी संस्थेतील अनाथ, निराधार बालकांना राख्या बांधून त्यांच्याप्रती आपले बंधुप्रेम व्यक्त केले. यावेळी न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, विमला गोयंका स्कूल, गोपाळ कृष्ण गोखले कॉलेज, नागोजीराव पाटणकर हायस्कूल, कळंबा गर्ल्स हायस्कूल, ब्लूमिंग बड्स स्कूल, राजमाता जिजामाता गर्ल्स हायस्कूल, जयभारत शिक्षण संस्था, डॉ. श्रीधर सावंत विद्यामंदिर, केएमसी कॉलेज, विवेकानंद कॉलेज, भारत स्काऊट गाईड, संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, शंकरराव चव्हाण विद्यामंदिर, पुनाळ;अजिंक्य युवा शक्ती, इनरव्हील क्लब आॅफ रोटरी महिला शाळा व संस्थांच्या विद्यार्थिनींनी मुलांना राख्या बांधल्या.