शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरचे गिर्यारोहक करणार हिमचढाई

By admin | Updated: May 25, 2016 01:10 IST

एक जूनपासून प्रारंंभ : मलय अ‍ॅडव्हेंचर्सतर्फे तेरा हजार फुटावरील शिखर मोहीम

कोल्हापूर : मुंबईतील मलय अ‍ॅडव्हेंचर्सतर्फे आयोजित देवतिब्बा व नोरबू या हिमशिखर मोहिमेत खुशी कांबोज (वय १४), प्रसाद आडनाईक (२३) व शिवतेज पाटील (१९) हे तीन युवा गिर्यारोहक कोल्हापूरचे प्रतिनिधित्व करणार करणार आहेत.नवीन गिर्यारोहक तयार व्हावेत या उद्देशाने या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. २८ दिवस चालणाऱ्या या मोहिमेची सुरुवात दि. १ जूनपासून होत आहे. हिमाचल प्रदेशात मनालीपासून काही अंतरावर असणाऱ्या जगतसुख व्हॅलीमधून देवतिब्बा या मोहिमेची सुरुवात होते. जगतसुख-सेरी-चिक्का असा तीन दिवसांचा ट्रेक करुन समुद्रसपाटीपासून तेरा हजार फूट उंचीवर चंद्रताल येथे बेसकॅम्प सेट करण्यात येईल. त्यानंतर चौदा हजार आठशे फूट उंचीवरील अ‍ॅडव्हान्स बेस कॅम्प हा या मोहिमेतील सर्वांत आव्हानात्मक टप्पा पार केला जाईल. त्यानंतर वेगवेगळ्या उंचीवर बेस कॅम्प सेट करीत ही मोहीम पार करण्यात येईल. गेल्यावर्षी खुशीने क्षीतीधार व हनुमान तिब्बा या मोहिमा यशस्वीपणे पूर्ण केल्याने तिची देवतिब्बा मोहिमेसाठी निवड झाली आहे. ती या मोहिमेत यशस्वी झाल्यास देबतिब्बा समीट करणारी सर्वांत लहान गिर्यारोहिका ठरणार आहे तसेच या मोहिमेत सहभागी होणारे प्रसाद व शिवतेज हे नोरक हिमशिखरावर आरोहण करणार आहेत.या मोहिमेतील सर्व टीमसाठी गेल्या दोन महिन्यांपासून लोणावळ्याजवळील ठाकभैरी व रांगणा किल्ला परिसरात सराव शिबिरे घेण्यात आली. महिबूब मुजावर यांच्या नेतृत्वाखाली या मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून वेस्टर्न माउंटन स्पोर्टस्चे अध्यक्ष विनोद कांबोज, हिल रायडर्स अ‍ॅन्ड हायकर्स ग्रुपचे अध्यक्ष प्रमोद पाटील, परेश चव्हाण हे तिन्ही गिर्यारोहकांना मार्गदर्शन करत आहेत. या मोहिमेसाठी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांचे सहकार्य लाभले आहे. (प्रतिनिधी)