बोरवडे : शहरी (स्मार्ट सिटी) भागाप्रमाणे स्मार्ट ग्राम बनविण्याचा संकल्प शासनाने केला आहे. माळीण गावाला सावरण्यासाठी माळीण गावाचे पुनर्वसन होत आहे. राज्यातील पहिले स्मार्ट ग्राम म्हणून माळीण गावाची ओळख निर्माण करण्याचा शासनाचा विचार आहे. नुकतीच या संदर्भात मंत्रिमंडळाची बैठक झाली असून, त्या ठिकाणी सर्व आधुनिक तंत्रज्ञान वापरुन, पर्यावरणाचे रक्षण करून चांगल्या दर्जाची घरे बांधण्याचा शासनाचा मानस आहे, अशी माहिती ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.बोरवडे (ता. कागल) येथे कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी गोकुळ दूध संघाच्या संचालकपदी अमरीश घाटगे यांची निवड झाल्याबद्दल व ग्रामपंचाय्त सदस्य बालाजी फराकटे यांचा सामाजिक कार्याबद्दल मंत्री केसरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.‘बिद्री’चे संचालक राजेखान जमादार, कागलचे सभापती श्रीकांत लोहार, आनंदराव साठे, दिनकर साठे, जोतिराम साठे, संतोष ढवण, संभाजी फराकटे, शहाजी बलुगडे, सुनील वारके, सूरज फराकटे, प्रवीण साठे, विकास डाफळे, शिवराज फराकटे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. पांडुरंग खाडे यांनी आभार मानले. (वार्ताहर)
स्मार्ट ग्राम योजना राबविणार
By admin | Updated: May 15, 2015 00:05 IST