शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

शेतीचे लहान-लहान झालेले तुकडे मोठी समस्या

By admin | Updated: April 21, 2017 00:10 IST

राजू शेट्टी : दिल्ली येथे कृषिमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष टी. हक्क यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

जयसिंगपूर : देशामधील लाखो एकर सुपीक जमीन पडीक पडलेली आहे. ही जमीन पिकाखाली आणण्याचे एक मोठे आव्हान आहे. शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांची वाढती लोकसंख्या त्यामुळे शेतीचे झालेले लहान-लहान तुकडे ही एक मोठी समस्या निर्माण झाल्याची माहिती खासदार राजू शेट्टी यांनी दिली.देशात तुकड्याच्या शेतीचे प्रमाण वाढले असून, कूळ कायद्याच्या भीतीपोटी लाखो एकर जमीन पडीक असल्याने ही जमीन पिकाखाली आणण्यासाठी नवीन जमीन भाडेकरार कायदा अंमलात येणार आहे. याबाबत दिल्ली येथे कृषिमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. टी. हक्क याच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक झाली. याबाबत खा. शेट्टी यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे माहिती दिली.तुकड्याची शेती परवडत नसल्याने अशी शेती पडीक राहते. विशेष करून कोकणात यांचे प्रमाण जास्त आहे. कूळ कायद्याच्या भीतीमुळे ही जमीन पडीक असल्याने ही शेती दुसऱ्यालाही कसायला दिली जात नाही. या सर्व गोष्टींचा विचार करून नीती आयोगाने देशातील अशी पडीक जमीन पिकाखाली आणण्याच्या दृष्टिकोनातून जमीन भाडेतत्त्वाचे नवीन धोरण आणण्याचे ठरविलेले आहे. या नवीन धोरणाचा मसुदा तयार करण्याची जबाबदारी कृषिमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. टी. हक्क यांच्यावर सोपविली आहे.डॉ. टी. हक्क यांच्या अध्यक्षतेखाली दिल्ली येथे उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीला देशातील प्रमुख शेतकरी, नेते, सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी, तसेच महसूल खात्यातील उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते.यावेळी खासदार शेट्टी यांनी या नवीन धोरणाचे स्वागत करून मूळ जमीन मालकाचे हक्क आबादित ठेवून जमीन भाडेकराराने दिल्यास कूळ कायदा लागणार नाही, याची हमी दिल्यास अनेक जमीनमालक आपली जमीन भाडेतत्त्वावर देण्यास तयार होतील. तसेच अनेक छोटे शेतकरी व शेतमजूर दुसऱ्याची शेती कसायला घेतात; परंतु त्यांना त्या जमिनीवर पीक कर्ज मिळत नाही. पीक विमा, नुकसान भरपाई अथवा अनुदान मिळविण्यासाठी पात्र राहत नाहीत. यासाठी जमिनीचे करार कायदेशीर करून मूळमालकाचे अधिकार आबादित ठेवून कसणाऱ्यालाही दिलासा देण्याचे काम या नवीन धोरणामुळे होणार असल्याच्या सूचना त्यांनी माडल्या. सांगलीचे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, बिहारचे खासदार के. सी. त्यागी, माजी मंत्री रेणुका चौधरी यांच्यासह नीती आयोगाचे अधिकारी, महसूल विभागातील प्रतिनिधी उपस्थित होते. (प्रतिनिधी)