शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारास घोषवाक्यांची ‘क्रेझ’

By admin | Updated: September 16, 2014 00:08 IST

तरुणाईचा कानोसा : अपडेट अन् लाईकचा लेखाजोखा; नेत्यांचीही सोशलगिरी

संतोष पाटील- कोल्हापूर -यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारास अत्यंत कमी वेळ मिळणार आहे. आचारसंहिता सुरू झाल्यापासूनच इच्छुकांनी अल्पखर्चात मतदारांपर्यंत पोहोचविणाऱ्या सोशल मीडियाचा जोरात वापर सुरू केला आहे. सर्वच प्रमुख उमेदवारांनी नावापेक्षा घोषवाक्याला प्राधान्य दिले आहे. ‘तुम्ही माझ्या बरोबर’, ‘फक्त लढ म्हणा’, ‘हक्काचा माणूस’, ‘साधा माणूस’, अशी बिरुदावली असलेली घोषवाक्ये सोशल मीडियात फिरत आहेत. अनेकांनी सोशल मीडिया सेलची निर्मिती केली, जुने फोटो व प्रचाराच्या अपडेटला मिळणाऱ्या हिटस् व लाईकचा लेखाजोखा मांडला जातोय. निवडणूक ज्वर वाढेल, तशी नेत्यांची सोशलगिरीही वाढणार आहे.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपणच विकास करण्यासाठी कसे योग्य उमेदवार आहोत. नेत्यांसह कार्यकर्त्यांची फेसबुक, वॉटस् अ‍ॅपसारखी माध्यमे सुसाट वेगाने धावत आहेत. यावर प्रशासन मात्र बारकाईने लक्ष ठेवून आहे.निवडणुकीच्या काळात इतरवेळी दुर्मीळ असलेल्या नेत्यांचे सोशल मीडियाच्या माध्यमातून का असेना, जनतेला नित्यनियमाने दर्शन घडते. कमी कालावधीत फुकटच्या प्रचारासाठी कॉम्प्युटर ज्ञानात कच्चे असणाऱ्यांनी खास लोकांना पाचारण केले आहे. सोशल मीडियावरून येणाऱ्या सूचना व समस्या सोडविण्यासाठी स्वतंत्र टीम कार्यरत आहे. आंदोलने, मोर्चा, विकासकामे, आवाहन, शुभेच्छा, सोडविलेल्या समस्या, आदींबरोबरच माहिती देण्याबरोबरच कार्यकर्ते जमविण्यासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात उपयोग करत आहेत. एक गठ्ठा ‘एसएमएस’वर प्रशासनाची करडी नजर राहणार आहे. निवडणूक आचारसंहिता व समाजात तेढ निर्माण होईल, अशा प्रकारचे मेसेज सोशल मीडियाच्या माध्यमातून दिले जाऊ नयेत, तसेच अशा प्रकारचा कोणी आगाऊपणा केल्यास त्याच्यावर कारवाई करण्यासाठी जिल्हा प्रशासन व पोलिसांनी स्वतंत्र ‘सोशल मीडिया सेल’ स्थापन केला आहे. समाजस्वास्थ्य बिघडविणारे किंवा एखाद्याचे जाणीवपूर्वक चारित्रहनन करणाऱ्या मेसेजबाबत माहिती मिळाल्यास निवडणूक कार्यालयाशी संपर्क साधा. - राजाराम माने, जिल्हाधिकारी