शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
"...तर रशियाही अणु चाचण्या करेल";व्लादिमीर पुतीन यांची थेट अमेरिकेला धमकी
4
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
5
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
6
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
7
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
8
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
9
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
10
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
11
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
12
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
13
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
14
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
15
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
16
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
17
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!
18
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
19
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
20
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...

गावोगावी घुमतोय ‘ड्राय रंगपंचमी’चा नारा

By admin | Updated: March 25, 2016 00:09 IST

विद्यार्थी रंगणार कोरड्या रंगात... आम्ही शपथ घेतो की...

प्रशासन, शैक्षणिक, सामाजिक संस्थांही सरसावल्यावाई : सातारा जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणी दुष्काळाची दाहकता जाणवत आहे़ वेळ पडल्यास ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध आहे़, तेथून आणावे लागणार आहे़ त्यामुळे ज्यांच्याकडे पाणी आहे अशा सर्वच घटकांनी पाण्याची बचत करणे काळाची गरज आहे़ ‘लोकमत’ने पाण्याचे महत्त्व ओळखून घेतलेला इनिशिएटिव्ह हा एक स्तुत्य उपक्रम आहे, असे मत उपविभागीय पोलिस अधिकारी दीपक हुंबरे यांनी व्यक्त केले.उपविभागीय पोलिस विभागाच्या कार्यालयात आयोजित शैक्षणिक, सामाजिक संस्थांच्या बैठकीत ते बोलत होते. ‘लोकमत’ने सामाजिक बांधिलकी म्हणून कोरडी रंगपंचमी करण्याचे आवाहन केले असून त्याला सर्व स्तरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे़, असेही हुंबरे म्हणाले. विद्यार्थी रंगणार कोरड्या रंगात...आम्ही शपथ घेतो की...कऱ्हाड : कऱ्हाड तालुक्याला दुष्काळाची झळ बसत नसली तरी आसपासचे तालुके दुष्काळात होरपळत आहेत. ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन रंगपंचमीच्या निमित्ताने होणारा पाण्याचा अपव्यय टाळण्याची व पाणी बचत करण्याची शपथ येथील टिळक हायस्कूल व पालिका शाळा क्र. ९ च्या विद्यार्थ्यांनी घेतली. शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ही शपथ दिली. ‘लोकमत’ने हाती घेतलेल्या पाणी बचत चळवळीला आता शाळांचेही बळ मिळत आहे. या चळवळीत शाळा स्वयंस्फूर्तीने सहभागी होत आहेत. मुलांना पाणी बचतीचे धडे शाळांमधूनच दिले जात आहेत. मुलांनी कोरड्या रंगांनी रंगपंचमी खेळणार असल्याचे सांगितले.कऱ्हाडमध्ये शाळेतील शिक्षकही सहभागी प्रत्येक विद्यार्थ्याने कोरडी रंगपंचमी साजरी करून पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन मुख्याध्यापक मणेर यांनी केले. त्यानंतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कोरडी रंगपंचमी साजरी करण्याची शपथ दिली. यावेळी शिक्षक उपस्थित होते. कऱ्हाड पालिका शाळा क्र. ९ मध्येही विद्यार्थ्यांनी कोरडी रंगपंचमी साजरी करण्याची शपथ घेतली. शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ही शपथ दिली. शैक्षणिक संस्थाकलासागर अ‍ॅकॅडमी, सुयश कॉम्प्युटर टे्रनिंग सेंटर, संजीवनी कॉम्प्युटर अ‍ॅकॅडमी, श्री टेक्निकल इस्टिट्यूट, फिनिक्स कॉम्प्युटर, स्कॉलर कॉम्प्युटर, आयटीएमटी टेक्निकल, अर्थ अ‍ॅनिमेशन इत्यादी संस्थांनी या उपक्रमात सहभागी होऊन आपल्या विद्यार्थ्यांना कोरडी रंगपंचमी खेळण्यासाठी आवाहन केले आहे़सामाजिक संस्थासमूह संस्था, पंतजली योग समिती, सुयश प्रतिष्ठान, स्वच्छ वहाते कृष्णामाई मंच, रोटरॅक्ट क्लब, वाई व काळेश्वरी ट्रस्ट या सामाजिक संस्था सहभागी झाल्या आहेत़ सोशल मीडियाचा सकारात्मक उपयोग सहभागी शैक्षणिक, सामाजिक संस्थांनी सोशल मीडियावर पाणी बचत व कोरडी रंगपंचमी खेळण्याविषयी आवाहन केल्याचे दिसते. दानवलेवाडीत विद्यार्थ्यांनी घेतली पाणीबचतीची शपथअवघा महाराष्ट्र दुष्काळाच्या झळा सोसत आहे. पाणीबचत ही काळाची गरज बनली आहे. ‘लोकमत इनिशिएटिव्ह’च्या माध्यमातून जिल्ह्यात ड्राय रंगपंचमी खेळून पाणीबचतीचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून माण तालुक्यातील दानवलेवाडी येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी कोरड्या रंगांनी रंगपंचमी खेळून पाणीबचत करण्याची शपथ घेतली.‘सुखात्मे’च्या विद्यार्थ्यांचा ‘जल है तो कल है’चा नारासातारा : पाणीबचतीचा संदेश देत गौरीशंकरच्या डॉ़ पी़ व्ही़ सुखात्मे इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पोवई नाका ते गांधी मैदान अशी ‘पाणी बचत’ प्रबोधनपर फेरी काढली. विद्यार्थ्यांनी ‘जल है तो कल है’ असा नारा देत शहरातून फेरी काढली. नैसर्गिक जलसाठे जतन करुन पाण्याचा थेंबन्थेंब वाचवून दुष्काळावर मात करुया, अशा आशयाचे फलक हातात घेऊन समाजाचे लक्ष वेधले़ पाण्यासाठी आणीबाणी नको, पर्यावरणाचे रक्षण करुया, जलसंपतीचे रक्षण करुया, जपून वापरु पाणी, थेंब थेंब पाण्याची करुया बचत, पाणी आडवा पाणी जिरवा अशा विविध घोषणा फलकावर लिहिल्या होत्या. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष मिलिंद जगताप, प्रशासकीय अधिकारी नितीन मुडलगीकर, जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर, प्राचार्य विजय राजे, प्राचार्या डॉ़ नवनिता पटेल उपस्थित होते़