शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कत्तलखाना ‘तडजोडी’ने फोडला घाम

By admin | Updated: June 29, 2015 00:41 IST

प्रशासनाची आडकाठी : पैशाच्या तगाद्याची चिंता; निविदेनंतर प्रक्रिया संथगतीने

संतोष पाटील - कोल्हापूर -अत्याधुनिक असा ‘बीओटी’ तत्त्वावरील कत्तलखाना आयसोलेशन हॉस्पिटल परिसरात उभारला जाणार आहे. नागरिकांच्या विरोधानंतर संथगतीने का होईना, गेले वर्षभर निविदा प्रक्रियेसह सभागृहाची संमती व विविध विभागांच्या मंजुरींचे सोपस्कार पूर्ण झाले. मात्र, आता प्रशासनाच्या आडकाठीने प्रकल्पाला खीळ बसण्याची शक्यता आहे. वेळेत कत्तलखाना रद्दबादल झाल्यास ठेकेदाराचा निर्यात परवाना अडचणीत येणार आहे; तर यासाठी घेतलेली ‘तडजोडी’ची रक्कम संबंधितांना परत करावी लागणार असल्याने दोन्ही बाजूंना मोठी अस्वस्थता पसरली आहे. आयसोलेशन परिसरात शासनाकडून महापालिकेला मिळालेल्या ४८ एकर जागेपैकी चार एकर जागा कत्तलखान्यासाठी निश्चित केली आहे. या जागेचे आरक्षण बदलाचे सोपस्कारही ठेकेदारानेच पूर्ण केले. पालिकेकडे एक कोटी रुपये बिनपरताव्याची, तर २५ लाख रुपये अनामत रक्कम जमा केली. याशिवाय इतर ‘फॉरमॅलिटी’चे सोपस्कारही पूर्ण केले. दरवर्षी पाच टक्के वाढीसह २० लाख रुपये महापालिकेला देत ठेकेदार उभारणीचा २० कोटी रुपयांचा खर्च करणार आहे. वीज, पाणी, कर्मचारी वर्ग या सर्व गोष्टींची पूर्तता ठेकेदारच करणार आहे. येथे स्थानिक विक्रेत्यांना तेथील शीतगृह (चिलिंग सेंटर) दोन तासांकरिता मोफत उपलब्ध होईल. कटिंग केलेली जनावरे संबंधित दुकानांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी पालिकेची आहे. पुढील तीन वर्षांनंतरच कटिंगचे दरात वाढ होईल. इचलकरंजी, सांगली-मिरज येथे अद्ययावत कत्तलखाने आहेत. मात्र, प्रशासकीय कुरघोडीमुळे कोल्हापूरकरांच्या आरोग्याचा खेळखंडोबा सुरू आहे.असा असेल प्रकल्पलहान व मोठ्या जनावरांसाठी दोन वेगवेगळे, अत्याधुनिक व पूर्णत: स्वयंचलित कत्तलखाने असतील. भोवतालच्या जागेत सुंदर बगीचा केला जाणार आहे. कत्तलखान्यातून बाहेर पडणारे सांडपाणी थेट गटारीत न सोडता त्यावर प्रक्रिया करून बगीच्यासाठी वापरले जाणार आहे. महापालिकेचे अधिकृत कत्तलखाने गेली चार वर्षे बंदच आहेत. तरीही ‘झूम’मध्ये मोठ्या जनावरांचे अवशेष सहजपणे आढळतात. शहरात विक्री होणाऱ्या मांसाची शास्त्रीय तपासणीच होत नाही. बंद असलेले कत्तलखाने म्हणजे शहरवासीयांच्या आरोग्याशी खेळण्याचाच प्रकार आहे.ठेकेदाराची कत्तलखाना प्रसंगी तोट्यात चालविण्याची तयारी असल्यानेच प्रशासनाच्या मनात शंकेची पाल चुकचुकत आहे. ठेका मिळविण्यासाठीही मोठी सुपारी फुटल्याची चर्चा आहे. कत्तलखाना सुरू न झाल्यास ठेकेदाराचा निर्यात परवाना अडचणीत येणार आहे, तर ठेक्यासाठी घेतलेले पैसेही संबंधितांना परत करावे लागणार आहेत. यामुळे कत्तलखान्याचा मार्ग सुकर करण्याच्या हालचालीही वेगावल्या आहेत.