शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

‘न्यायनगरी’साठी ३२ झाडांची कत्तल

By admin | Updated: November 24, 2014 23:58 IST

प्रजासत्ताकची तक्रार : वृक्ष प्राधिकरणाची ‘सार्वजनिक’ला नोटीस

कोल्हापूर : कसबा बावडा मार्गावरील रि.स.नं. ९४९ या मिळकतीच्या जागेवर सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी)तर्फे ‘न्यायनगरी’ या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या इमारतीच्या उत्तर बाजूला संरक्षक भिंत बांधण्यासाठी ठेकेदाराने आठ चंदनाच्या झाडांसह एकूण ३२ झाडांची कत्तल केली आहे. या प्रकरणी प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे दिलीप देसाई यांनी लेखी तक्रार केल्यानंतर आज, सोमवारी महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने पंचनामा करून ‘पीडब्ल्यूडी’ला नोटिसीद्वारे दंडात्मक कारवाईचा इशारा दिला आहे. संबंधितांवर पाच हजार रुपये किंवा एक वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. तोडलेल्या वृक्षांमध्ये चंदनाचे वृक्ष आहेत. या सर्व वृक्षांची कत्तल करून त्यांची परस्पर विल्हेवाट लावण्यात आल्याने घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ कारवाईची मागणी देसाई यांनी केली. यामुळे हडबडलेल्या यंत्रणेने दोन तासांत घटनेचा पंचनामा करून सार्वजनिक बांधकाम विभागास नोटीस लागू केली. (प्रतिनिधी)कायदा काय सांगतो...महाराष्ट्र नागरी झाडांचे संरक्षण व जतन अधिनियमन १९७५ अन्वये विना परवाना वृक्षतोड हा गंभीर गुन्हा आहे. प्रत्येक झाडासाठी एक हजार ते पाच हजार रोख दंड, तसेच आठवडा ते एक वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद आहे. कत्तल केलेल्या झाडांसाठी परवानगी घेतलेली नाही. यांची परस्पर विल्हेवाट लावली आहे. वृक्षतोड करून संबंधितांनी त्याची परस्पर विल्हेवाट लावली आहे. चंदनाच्या झाडाचा हिशेब तर प्रत्येक इंचात असतो. यामुळे या वृक्षतोडीमागे मोठे षड्यंत्र असल्याची शक्यता आहे. महापालिकेने कडक कारवाई न केल्यास या प्रकरणी न्यायालयात दाद मागणार आहे. - दिलीप देसाई, तक्रारदारअसा आहे पंचनामामहापालिकेने केलेल्या पंचनाम्यात अडीच फूट घेराच्या सुबाबळ आठ नग, नऊ फुटांचे पूर्ण वाढ झालेले एक चंदनाचे झाड, मुळ्या तुटलेले एक चंदनाचे झाड, तोडलेल्या स्थितीतील सात चंदनाची झाडे, अशी एकूण ३२ झाडे तोडल्याचे म्हटले आहे. मुकादम बाजीराव कांबळे यांनी केलेल्या पंचनाम्यावर प्रजासत्ताकचे सचिव बुरहान नायकवडी व आर. व्ही. मुनीश्वर यांच्या पंच म्हणून स्वाक्षऱ्या आहेत.कडक कारवाईचा इशारासार्वजनिक बांधकाम विभागास नोटिसीद्वारे तीन दिवसांची मुदत दिली आहे. मुदतीत लेखी म्हणणे सादर न केल्यास महाराष्ट्र नागरी झाडांचे संरक्षण व जतन अधिनियमन १९७५ अन्वये कडक कारवाईचा इशारा महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने दिला आहे.