शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
2
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
3
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
4
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
5
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
6
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
7
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
8
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
9
₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
10
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
11
Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
12
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
13
कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?
14
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
15
इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?
16
मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
17
पाकविरुद्ध १२ वर्षांपूर्वी धडाडली होती स्टेन'गन'! Jayden Seales नं वनडेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
18
"बँकर नाही, तुम्ही DJ बना," गोल्डमॅन सॅक्सच्या सीईओंवर डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप; म्हणाले, "तुमचे अंदाज..."
19
Lunchbox Recipe: ढोबळी मिरचीची 'अशी' करा पीठ पेरून भाजी; कोरडीही होत नाही-डब्यालाही नेता येते

स्लॅब कोसळून २० मजूर जखमी

By admin | Updated: February 4, 2016 01:08 IST

धर्मनगर येथील घटना : चौघे गंभीर; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली; सर्व जखमी बेळगावचे

जयसिंगपूर : सांगली-कोल्हापूर महामार्गावरील धर्मनगर येथे मंदिर सभागृहाचा स्लॅब कोसळून सुमारे २० मजूर जखमी झाले. यामध्ये चौघेजण गंभीर असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास स्लॅब टाकण्याचे काम सुरू असताना अचानक स्लॅब कोसळला. या घटनेनंतर तीन रुग्णवाहिकेतून जखमींना तातडीने जयसिंगपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्व मजूर कर्नाटकातील बेळगाव येथील आहेत. निमशिरगाव (ता. शिरोळ) येथील श्री क्षेत्र धर्मनगर येथे मंदिराच्या सभागृहाचे काम काही दिवसांपासून सुरू आहे. बुधवारी सभागृहाचा स्लॅब टाकण्याचे काम सकाळी साडेसातच्या सुमारास सुरू झाले. पाईपद्वारे तयार काँक्रीट टाकण्याचे काम सुरू होते. १८ हून अधिक जण स्लॅबवर काम करीत होते, तर तिघेजण खाली होते. दोन ट्रक स्लॅब टाकल्यानंतर तिसऱ्या ट्रकच्या वेळी प्रेशर पाईपद्वारे काँक्रीट स्लॅबवर पोहोचविण्याचे काम सुरू असताना प्रेशर पाईपच्या धक्क्याने स्लॅबच्या मदतीसाठी लावलेला लोखंडी खांब निसटला. त्यानंतर बघताबघता स्लॅब खाली कोसळला. मजुरांना वाचविण्यासाठी मंदिर परिसरातील नागरिकांची एकच धावपळ उडाली. सुरुवातीला हातकणंगले व जयसिंगपूरच्या १०८ या रुग्णवाहिकेतून जखमींना खासगी रुग्णालयात आणण्यात आले. त्यानंतर घोडावत ग्रुपच्या रुग्णवाहिकेतून उर्वरित जखमींना रुग्णालयात नेण्यात आले. यामध्ये प्रशांत मधुकर (वय २८), राजू बसरकट्टी (४५), निखिलेश म्हाथो (२५) व धुळाप्पा कुळकट्टी (३०) हे चौघेजण गंभीर जखमी असून, आप्पासाहेब जनगोंडा (३०), सुभाष जनगोंडा (३२), बाहुबली शंकरगोंडा (३२), रवी शंकरगोंडा (२२), प्रशांत शंकरगोंडा (३२), गणपत (३२), शांतीनाथ (३८), महावीर बस्तवाडे (३२), पिंटू निगडोळे (३२), अमर कांबळे (२६), बालेखान नदाफ (३२), राजेशकुमार म्हाथो (३३), सुभाष म्हाथो (२८, सर्व रा. बेळगाव) हे किरकोळ जखमी झाले. यांच्यासह उर्वरित जखमींवर प्रथमोपचार करण्यात आले. केवळ दैव बलवत्तर म्हणून... ६० बाय ७० फूट आकाराच्या सभागृहाचा स्लॅब सुरू असताना १८ हून अधिक मजूर स्लॅबवर काम करीत होते, तर प्रशांत मधुकर, राजू बसरकट्टी व अनिल वडर हे तिघे मजूर खाली होते. अचानक स्लॅब कोसळत आहे हे अनिलच्या लक्षात येताच तो बाजूला झाला.