शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

सायझिंग संपाबाबतचा तोडगा दृष्टिक्षेपात

By admin | Updated: September 8, 2015 23:41 IST

राजू शेट्टी, प्रकाश आवाडे यांची माहिती : सायझिंगधारक, कामगार संघटना या दोघांचीही भूमिका सकारात्मक

इचलकरंजी : सायझिंग कामगारांच्या संपाबाबतचा तोडगा दृष्टिक्षेपात आला असून, सायझिंगधारक व कामगार संघटना सकारात्मक आहेत. जिल्हाधिकाऱ्यांचा ५०० रुपयांचा वेतनवाढीचा तोडगा सायझिंगधारक कृती समितीने मान्य केला आहे, तर कामगार संघटनेची मागणी ७०० रुपयांची आहे. त्यामुळे संप आता निर्णायक वळणावर आला आहे, अशी माहिती खासदार राजू शेट्टी व माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी पत्रकारांना दिली.यंत्रमाग उद्योगातील सुधारित किमान वेतनाबाबत विचारविनिमय करून पुढील दिशा ठरविण्यासाठी यंत्रमागधारकांच्या पाचही संघटनांनी खासदार राजू शेट्टी यांना पाचारण केले होते. इचलकरंजी पॉवरलूम विव्हर्स असोसिएशनच्या कार्यालयात या बैठकीस खासदार शेट्टी, माजी मंत्री प्रकाश आवाडे, इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे सतीश कोष्टी, राजगोंड पाटील, सागर चाळके, यंत्रमागधारक जागृती संघटनेचे विनय महाजन, जिल्हा पॉवरलूम असोसिएशनचे दीपक राशिनकर, पॉपलीन यंत्रमागधारक संघटनेचे सचिन हुक्कीरे, राष्ट्रवादी पॉवरलूम असोसिएशनचे विश्वनाथ मेटे, नारायण दुरुगडे, आदी उपस्थित होते.सुधारित किमानवेतन अन्य राज्यांपेक्षा अधिक असल्याने ते येथील यंत्रमाग उद्योगाला घातक ठरत आहे. त्यामुळे शासन स्तरावर किमान वेतन बदलासाठी व ते उत्पादनाशी निगडित ठेवण्यासाठी जोरदार प्रयत्न व्हावेत; अन्यथा राज्यातील यंत्रमाग उद्योग मोडकळीस येईल, असे म्हणणे यंत्रमागधारक प्रतिनिधींनी यावेळी मांडले. यावर शेट्टी यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांकडे प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले, तर आवाडे यांनी किमान वेतन बदलासाठी शासनाकडे केलल्या पाठपुराव्याची माहिती दिली. आवाडे यांनी सायझिंग-वार्पिंग कामगार संघटनेचे नेते ए. बी. पाटील यांना बैठकीचे निमंत्रण दिले. त्यानंतर समाजवादी प्रबोधिनीच्या सभागृहात खासदार शेट्टी व माजी मंत्री आवाडे यांनी कामगार संघटनेचे पाटील, सुभाष निकम, कृष्णात कुलकर्णी यांच्यासह सर्व संघटना पदाधिकारी यांच्यासोबत चर्चा केली. सुमारे अर्धा तास ही बैठक चालली. खासदार शेट्टी व आवाडे म्हणाले, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या संयुक्त बैठकीनंतर सायझिंग कामगारांचा संप मिटविण्यासाठी अनेक घडामोडी झाल्या. त्यामुळे सायझिंगधारक कृती समितीने कामगारांना वेतनवाढ देण्याविषयी व कामगार संघटनांनी कामगारांसाठी तात्पुरती वेतनवाढ घेऊन कारखाने सुरू करण्याचा केला आहे. येत्या दोन-चार दिवसांत चर्चा होऊन सायझिंग कारखाने सुरू होतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. (प्रतिनिधी) नवे वस्त्रोद्योग धोरण लवकरच : पाटील कोल्हापूर : राज्यातील वस्त्रोद्योगाला ऊर्जितावस्था देण्यासाठी राज्य सरकार लवकरच नवीन वस्त्रोद्योग धोरण जाहीर करेल, अशी माहिती पालकमंत्री तथा राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली. वस्त्रोद्योगांना किती भागभांडवल द्यायचे, विजेचे दर किती ठेवायचे, अशा विविध अंगानी अभ्यास करून धोरणांत समावेश केला जाईल. अमरावतीच्या धर्तीवर राज्यात ठिकठिकाणी मेगा कॉम्प्लेक्स उभारली जातील. ज्यामध्ये कच्चा माल आल्यापासून तयार कपड्यांपर्यंतची उत्पादने अशा ‘मेगा कॉम्प्लेक्स’मधून होतील, असे पाटील म्हणाले. अनेक सूतगिरण्या आर्थिक अडचणीत आहेत. कर्जाच्या खाईत सापडल्या आहेत. या सूतगिरण्यांच्या मालकांना जमिनी विकण्याचे अधिकार देण्याचा सरकारचा विचार आहे. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल, सूतगिरण्या सुस्थितीत येतील अशी अपेक्षा असल्याचे पाटील म्हणाले. सायझिंग कामगारांनी सुरू केलेल्या संपाचा मंगळवारी ५० वा दिवस होता. दिवसभरामध्ये सायझिंग कामगारांचा मेळावा, सायझिंगधारक कृती समितीने सहायक कामगार आयुक्तांना दिलेले निवेदन आणि खासदार शेट्टी व माजी मंत्री आवाडे यांनी बैठक घेऊन कामगार संघटनेशी केलेली चर्चा अशा सकारात्मक घटना घडल्या. त्यामुळे शहरातील औद्योगिक क्षेत्रात विक्रमी ठरणारा हा संप संपुष्टात येण्यासाठी कोंडी फुटण्यास सुरुवात झाल्याची चर्चा येथील उद्योजकांमध्ये होती.कामगारांनी कमाल माप पदरात घेऊन सायझिंग सुरू करावेतकामगार मेळाव्यात नेत्यांचे आवाहनइचलकरंजी : सायझिंग कारखान्याच्या परिस्थितीनुसार वेतनवाढ देण्याची क्षमता बदलत जाते. म्हणून कामगारांनी सातशे रुपये आणि त्याहून वेतनवाढ देणाऱ्या सायझिंगधारकांबरोबर चर्चा करून वेतनवाढीचे कमाल माप पदरात घ्यावे आणि सायझिंग कारखाने सुरू करावेत, असे आवाहन मंगळवारी कामगारांच्या मेळाव्यात केले.सायझिंग कामगारांचा मेळावा दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास झाला. त्या मेळाव्यामध्ये कामगार नेते ए. बी. पाटील, सुभाष निकम, मुमताज हैदर, चंद्रकला मगदूम, कृष्णात कुलकर्णी, आदींची भाषणे झाली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या बैठकीचा ऊहापोह करण्यात आला. शनिवारच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी तोडगा काढताना अचानकपणे ५०० रुपयांचा प्रस्ताव ठेवला. त्याऐवजी कामगारांना किमान किती घेणे परवडते आणि सायझिंगधारकांना कमाल किती देणे परवडते, असे जिल्हाधिकाऱ्यांनी विचारावयास पाहिजे होते, असेही यावेळी वक्त्यांनी सांगितले.दरम्यान, संप काळात वेतन न मिळाल्याने कामगारांना आर्थिक टंचाई भासत आहे. त्यासाठी मदत फेरी काढण्यात आली. त्यामध्ये सुमारे एक लाख रुपयांची रोख रक्कम व १६ क्विंटल धान्य जमा झाले आहे. त्यामधील काही रक्कम व जोंधळे, गहू, व तांदूळ असे धान्य गरजवंत कामगार कुटुंबांना वाटप करण्यात आले. (प्रतिनिधी)५०० रुपये वाढ देण्याची तयारीसायझिंगधारक कृती समितीच्या शिष्टमंडळाने मंगळवारी सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव यांना निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, जिल्हाधिकारी अमित सैनी यांचा ५०० रुपये वाढीचा प्रस्ताव आम्हाला मान्य आहे. उच्च न्यायालयात होणाऱ्या निर्णयाला अधीन राहून आम्ही वेतनवाढ देऊन कारखाने चालू करण्यास तयार आहोत. मात्र, कामगार संघटनेने सुरू केलेला संप जाहीरपणे मागे घ्यावा, असे म्हटले आहे. यावेळी संतोष कोळी, प्रकाश गौड, दिलीप ढोकळे, वसंतराव पाटील, आदी उपस्थित होते.५०० रुपये वाढ देण्याची तयारीसायझिंगधारक कृती समितीच्या शिष्टमंडळाने मंगळवारी सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव यांना निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, जिल्हाधिकारी अमित सैनी यांचा ५०० रुपये वाढीचा प्रस्ताव आम्हाला मान्य आहे. उच्च न्यायालयात होणाऱ्या निर्णयाला अधीन राहून आम्ही वेतनवाढ देऊन कारखाने चालू करण्यास तयार आहोत. मात्र, कामगार संघटनेने सुरू केलेला संप जाहीरपणे मागे घ्यावा, असे म्हटले आहे. यावेळी संतोष कोळी, प्रकाश गौड, दिलीप ढोकळे, वसंतराव पाटील, आदी उपस्थित होते.