नेत्यांनी एकत्र येऊन ग्रामपंचायत लढविण्याचा निर्णय येथील युवकांना रुचला नाही. त्यामुळेच ही निवडणूक होत आहे. येथे गेल्या आठ महिन्यात कोरोना महामारीत गावाने एकत्रित काम केले होते. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा गावातील प्रमुख नेत्यांचा मानस होता. त्यासाठी अंबाबाई मंदिरात नेत्यांनी बैठक घेऊन नऊ जागांचे वाटप केले. परंतु यावेळी गावातील तरुण कार्यकर्त्यांना विचारात न घेता आघाडी केल्यामुळे तरुणांनी नेत्यांना विरोध केला आहे.
येथील नेत्यांच्या बाळूमामा ग्रामविकास आघाडीचे नेतृत्व ‘बिद्री’चे माजी संचालक नंदकिशोर सूर्यवंशी, भिकाजी एकल, भगवान पातले, रणजित चौगले करत आहेत, तर विरोधी युवकांच्या अंबाबाई जनसामान्य स्वाभिमानी विकास आघाडीचे नेतृत्व सुनील वाडकर, विलास पाटील, सुनील कावणेकर, सागर हजारे करत आहेत.