शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर सोळा लाखांचा मद्यसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 23:32 IST

कोल्हापूर : गगनबावडा गावच्या हद्दीत विदेशी मद्याची वाहतूक करणारा आयशर टेम्पो राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने रविवारी पकडला. ...

कोल्हापूर : गगनबावडा गावच्या हद्दीत विदेशी मद्याची वाहतूक करणारा आयशर टेम्पो राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने रविवारी पकडला. यावेळी टेम्पोची झडती घेतली असता, १६ लाख किमतीचा मद्यसाठा मिळून आला. पथकाने मद्यसाठ्यासह टेम्पो, असा सुमारे ३० लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी टेम्पोचालक तन्वीर इकबाल शेख (वय २९, रा. न्यू सालेवाडा, गणेशनगर, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) याला अटक केली.गोव्याहून चोरटी विदेशी मद्याची तस्करी वाढू लागल्याने जिल्ह्याच्या सीमारेषेवर ‘उत्पादन शुल्क’च्या भरारी पथकाकडून वाहनांची तपासणी सुरू आहे. निरीक्षक एस. एस. साळवे, उपनिरीक्षक जितेंद्र पवार, जवान सुहास वरुटे, जयसिंग खुटावळे, सुखदेव सिद, मोहन पाटील, दिलीप दांगट, प्रसाद माळी, नितीन ढेरे हे पेट्रोलिंग करीत होते. यावेळी एमटीडीसी रिसोर्टच्या समोर टेम्पो (एम. एच. ४३ वाय ५१६१) पकडला. टेम्पोच्या पुढील बाजूस विशिष्ट प्रकारचा कप्पा करून मद्याचे २१० बॉक्स ठेवले होते. त्याचा भाव १६ लाख रुपये आहे. चालक शेख हा मद्यसाठा कोणाला देणार होता? यासंबंधी चौकशी सुरू आहे.