शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
5
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
6
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
7
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
8
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
9
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
10
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
11
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
12
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
13
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
14
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
15
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
16
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
17
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
18
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
19
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
20
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...

मालगाडीचे सोळा डबे घसरले

By admin | Updated: April 23, 2015 00:05 IST

आदर्कीनजीक अपघात : पुणे-मिरज मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प

आदर्की : पुणे-मिरज लोहमार्गावर आदर्की आणि वाठार रेल्वे स्थानकांदरम्यान बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास मिरजेकडून साखर घेऊन पुण्याकडे जाणाऱ्या मालगाडीचे १६ डबे घसरले. सात डबे रुळापासून चाळीस फूट भरावावरून खाली कोसळले, तर उर्वरित डबे दगडी भिंतीला धडकले. तीनशे मीटर रेल्वे रुळाच्या सिमेंट स्लीपरचे तुकडे झाले. दरम्यान, या अपघातामुळेपुणे-मिरज मार्गावरील सर्व गाड्या बुधवारी रद्द करण्यात आल्या.पुण्यापासून ११० किलोमीटर अंतरावर हा अपघात झाला. या भीषण अपघातामुळे अडीचशे मीटर अंतरावरील रूळ उखडले, तर सुमारे दोनशे स्लीपरचा अक्षरश: चुरा झाला. साखरेने भरलेले सहा डबे रूळ सोडून भरावावरून चाळीस फूट खोल (पान ८ वर)जाऊन भरावाच्या मातीत सात फूट रुतून बसले. अपघातस्थळ आदर्की गावापासून दोन किलोमीटर अंतरावर आहे. सकाळी सात वाजता वाठार स्टेशन रेल्वे कर्मचाऱ्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. रुळावरून घसरलेले डबे वगळता बाकीचे डबे दोन्ही बाजूंनी सोडवून वेगळे काढण्यात आले. ते आदर्की आणि वाठार स्थानकांवर सुरक्षितपणे नेण्यात आले. अपघातामुळे या मार्गावरील रूळ तुटून बाजूला गेले होते. त्यामुळे हा मार्ग खडीकरण केलेल्या रस्त्याप्रमाणे दिसत होता. रल्वे अपघात जोड-एक्स्प्रेस गाड्या कुर्डूवाडीमार्गे वळवल्यामिरज : साताऱ्याजवळ मालगाडी रुळावरून घसरल्याने बुधवारी मिरज ते पुणे मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. गांधीधाम, अजमेर, निजामुद्दीन, धनबाद, संपर्कक्रांती, महालक्ष्मी, सह्याद्री, चालुक्यसह सर्व एक्स्प्रेस गाड्या कुर्डूवाडीमार्गे वळविण्यात आल्या. कोयना एक्स्प्रेससहपॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे हाल झाले.कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस व मुंबईतून कोल्हापूरला येणारी कोयना एक्स्प्रेस रद्द करण्यात आली. कोल्हापूर-पुणे पॅसेंजर साताऱ्यापर्यंत सोडण्यात आली. सकाळी दहानंतर मिरज-पुणे मार्गावर लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्या मोठ्या संख्येने असल्याने येणाऱ्या व जाणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या मिरज-पंढरपूर-कुर्डूवाडीमार्गे वळविण्यात आल्या. गांधीधाम-बेंगलोर एक्स्प्रेस (क्र. १६५०५), लोकमान्य टिळक टर्मिनस - हुबळी एक्स्प्रेस (क्र. १७३१८), चंदीगड-यशवंतपूर एक्स्प्रेस (क्र. २२६८६), धनबाद-कोल्हापूर एक्स्प्रेस (क्र. ११०४६), निजामुद्दीन-गोवा एक्स्प्रेस (क्र. १२७८०), बेंगलोर-अजमेर एक्स्प्रेस (क्र. १६२१०), यशवंतपूर-निजामुद्दीन (क्र. १६६२९) संपर्कक्रांती एक्स्प्रेस कुर्डूवाडीमार्गे वळविण्यात आल्या. कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस पुण्यातून पाठविण्यात आली. कोल्हापूरला येणारी गोदिंया एक्स्प्रेस पुण्यातच थांबविण्यात आली. मिरजेतून पुण्यापर्यंत जाणाऱ्या पॅसेंजर गाड्या साताऱ्यात थांबविण्यात आल्या. मिरजेतून रात्री मुंबईला जाणाऱ्या चालुक्य एक्स्प्रेस, महालक्ष्मी एक्स्प्रेस, स'ाद्री एक्स्प्रेस पंढरपूर-कुर्डूवाडीमार्गे पाठविण्यात आल्या. कुर्डूवाडीमार्गे तब्बल तीन तास उशिरा रेल्वेगाड्या धावत असल्याने प्रवाशांचे हाल झाले. मुंबईला जाणाऱ्या रेल्वेगाड्या कुर्डूवाडी, दौंडमार्गे पुण्यावरून मुंबईकडे जात असल्याने रखडल्या होत्या. गुरुवारी दुपारपर्यंत रेल्वेमार्गाची दुरुस्ती सुरू राहणार असल्याने मुंबईतून येणाऱ्या महालक्ष्मी एक्स्प्रेस, सह्याद्री एक्स्प्रेस, कोयना एक्स्प्रेस कुर्डूवाडी-पंढरपूरमार्गे मिरजेला येणार आहेत. गुरुवारी दुपारपर्यंत मिरज-पुणे मार्गावरील वाहतूक सुरळीत होईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.मदतकार्य युद्धपातळीवरसकाळी दहा वाजता मिरजहून मदत पथक, एक मोठी व दोन छोट्या क्रेन, तीन जेसीबी आणण्यात येऊन मदतकार्य युद्धपातळीवर सुरू झाले. दुपारी बारा वाजता दौंडहून दुसरे मदत पथक मोठ्या क्रेनसह दाखल झाले आणि अपघातग्रस्त डबे हटविण्याच्या कामाला वेग आला.हे डबे साखरेच्या पोत्यांनी भरले होते. ते रिकामे करण्यासाठी लोणंद व सातारा येथून तीनशे हमाल आणण्यात आले. त्यांनी आठ डब्यांतील साखर उतरविल्यानंतर या डब्यांचा काही भाग गॅस कटरने कापून क्रेनद्वारे दूर करण्यास प्रारंभ झाला. चार वाजेपर्यंत या कामाला यश आले. तिकिटे रद्दची व्यवस्थारेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्याने, तसेच काही गाड्या वळविण्यात आल्याने आरक्षित रेल्वे तिकिटे रद्द केल्यास प्रवाशांना पूर्ण पैसे परत देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मिरज व कोल्हापुरात जादा खिडकी सुरू करून प्रवाशांना तिकिटाचे पैसे परत देण्यात आले.