शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

कार उलटून बेळगावचे सहाजण जखमी

By admin | Updated: April 30, 2015 00:30 IST

देवळेनजीक अपघात : आठवडाभरातील दुसरा अपघात

रत्नागिरी : रत्नागिरी- कोल्हापूर रस्त्यावरील देवळे जंगलवाडीजवळ (ता. संगमेश्वर) बुधवारी सकाळी एक मारूती गाडी उलटून एकाच कुटुंबातील सहाजण गंभीर जखमी झाले. सर्व जखमी कर्नाटकातील बेळगावजवळील देवेंद्रनगर येथील आहेत. त्यांच्यावर रत्नागिरी जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.देवेंद्रनगरच्या परशुराम मदळी हे आपले कुटुंब घेऊन मारूती कारने बेळगावहून गोव्याला (केए-२२/एम ८४२२)ने गेले होते. तेथून ते गणपतीपुळे येथे गेले. बुधवारी सकाळी गणपतीपुळेहून ते कोल्हापूरमार्गे बेळगावला जाणार होते. सकाळी १०.१५ वाजता त्यांची कार देवळे जंगलवाडीजवळ येताच चालकाचे नियंत्रण सुटले. गाडी उलटली व बाजूपट्टीवरून ४०० फूट फरफटत गेली. पुन्हा कोलांट्या घेत बांधावरून बाहेर गेली. कारमधील सर्वच्या सर्व ६ जण गंभीर जखमी झाले आहेत.अपघाताची माहिती कळताच नाणीज येथील रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी पोहोचली. त्यातून सर्व जखमींना देवळे प्राथमिक रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार करण्यात आले. जखमींची गंभीर स्थिती लक्षात घेऊन नंतर त्यांना रत्नागिरीच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये परशुराम विठ्ठल मदळी (६५), चालक कपील परशुराम मदळी (३८), कांचन कपील मदळी (३०), पल्लवी परशुराम मदळी (५५), श्लोक परशुराम मदळी (८), स्पर्श कपील मदळी (१) यांचा समावेश आहे. अपघात अतिशय भीषण होता. त्यात कारचा चक्काचूर झाला आहे. सर्वांच्या डोक्याला मार लागला आहे. परशुराम व स्पर्श यांच्या डोक्याला अधिक मार लागला आहे.करंजारी येथील विलास बेर्डे व त्यांच्या मित्रांनी अपघातातील जखमींना सहाय्य केले. आठवड्यात या भागातील झालेला हा दुसरा अपघात आहे. (प्रतिनिधी)