शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

सहापदरीकरणाला नवा मुहूर्त मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 00:49 IST

तानाजी पोवार । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : सातारा ते कागल या सुमारे १३३ किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या सहापदरीकरणाच्या कामाच्या ...

तानाजी पोवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : सातारा ते कागल या सुमारे १३३ किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या सहापदरीकरणाच्या कामाच्या निविदांचे शुद्धिकरण तब्बल २२ वेळा काढूनही ही प्रक्रिया अखेर नॅशनल हायवे आॅथॉरिटी आॅफ इंडियाने रद्दबातल ठरविली; पण त्यानंतर महिना उलटला तरीही नव्याने काढण्यात येणाऱ्या निविदेला मुहूर्त मिळेना. त्यासाठी सुस्तावलेल्या प्रशासनाकडे लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करण्याची आवश्यकता आहे. रोज या राष्टÑीय महामार्गावरून ये-जा करणाºया वाहनांची संख्या किमान ६० हजारांहून अधिक असतानाही शासनाने या कामाकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे.मुंबई ते बंगलोर-चेन्नई या राष्टÑीय महामार्ग क्र. ४८ साठी पुणे, सातारा, बंगलोर, चित्तूर आणि चेन्नई असा सुमारे १४१९ किलोमीटर लांबीचा मार्ग आहे. सातारा ते कागलपर्यंतच्या महाराष्टÑ हद्दीतील महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम रखडले आहे. बाकी इतर महाराष्टÑ व कर्नाटक हद्दींतील सर्वच कामे पूर्ण झालेली आहेत. उर्वरित महामार्गाच्या सहापदरीकरणाची प्रक्रिया डिसेंबर २०१७ पासून सुरू केली. त्यानंतर ‘नॅशनल हायवे आॅथॉरिटी आॅफ इंडिया’ने (एनएचआय)ने ५३८ दिवसांत तांत्रिक कारण पुढे करीत २२ वेळा शुद्धिपत्रक काढून निविदा प्रक्रिया लांबवत ठेवली. सुमारे दीड वर्षाच्या कालखंडानंतर सहापदरीकरणाच्या आराखड्याच्या खर्चात वाढ झाली. पुन्हा निविदा काढल्यास खर्चाचा आकडा भलताच फुगून हा विषय वादग्रस्त बनण्याची चिन्हे दिसू लागली. म्हणून रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत राष्टÑीय रस्ते विकास महामार्गाच्या बैठकीत ही निविदा प्रक्रियाच रद्द ठरविली व नव्यानेच निविदा प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला; पण आता या नव्याने निविदा प्रक्रियेसाठी प्रतीक्षाच करावी लागणार आहे.जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निघणारी ही नवी निविदा प्रक्रिया अद्याप लालफितीत अडकली आहे. त्याबाबत लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करण्याची आवश्यकता आहे. सध्या देशात, राज्यात भाजप सरकार असल्याने सहापदरीकरणाच्या नव्या निविदा प्रक्रियेच्या कामाचा नव्याने कधी प्रारंभ होणार? हा प्रश्न उपस्थित होत आहे. हा विषय मंत्रालय पातळीवरील असल्याने अधिकाऱ्यांनीही आता हात वर केले आहेत.‘बास्केट ब्रिज’ही अडकलासातारा ते कागल या सहापदरीकरण कामाच्या आराखड्यातच ‘कोल्हापूरचे प्रवेशद्वार’ संबोधल्या जाणाºया, १२६० मीटर लांबीच्या १७५ कोटी रुपये खर्चाच्या‘बास्केट ब्रिज’चाही समावेश आहे. आता सहापदरीकरणाच्या निविदा प्रक्रियेच्या चक्रानंतर ही प्रक्रियाच रद्दबातल ठरविल्याने त्यात बास्केट ब्रिजही अडकला आहे. मोठा बोलबाला झालेला व लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी लक्ष्य ठरविलेल्या या ‘बास्केट ब्रिज’चेही भवितव्य आता सहापदरीकरणाबरोबरच अधांतरी बनले आहे.