शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

फुलेवाडीत तीनपानी जुगार खेळणारे सहाजण अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:22 IST

कोल्हापूर : फुलेवाडी पहिला बसस्टॉप येेथे उघड्यावर तीनपानी पत्त्यांचा जुगार खेळणाऱ्या सहाजणांना जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून रोकडसह ...

कोल्हापूर : फुलेवाडी पहिला बसस्टॉप येेथे उघड्यावर तीनपानी पत्त्यांचा जुगार खेळणाऱ्या सहाजणांना जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून रोकडसह ९८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई रविवारी सायंकाळी केली.

अटक केलेल्यांची नावे अशी : तानाजी शामराव मोटे (वय ४२), राजू गुंडाप्पा पाटील (४५), मानसिंग बाबाजी संकपाळ (३८, सर्व रा. फुलेवाडी), रमेश नवनाथ पाटील (४१, रा. दुधाळी), गुरुनाथ मनोहर सुतार (३१, रा. शिंगणापूर कमानीनजीक), अमर बाळकृष्ण कदम (२८, रा. गणेशनगर, चंबुखडी, ता. करवीर).

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फुलेवाडी पहिला बसस्टाॅप येथे घाण्याशेजारी उघड्यावर काहीजण एकत्र येऊन पत्त्यांच्या भारी पानांवर, चढाओढीने पैसे लावून तीनपानी पत्त्यांचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावेळी पोलिसांनी तेथे छापा टाकून सहाजणांना अटक केली. त्यांच्याकडून रोख १८५० रुपये, दोन मोबाईल संच असा सुमारे ९,८५० रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला. अटक केलेल्यांवर महाराष्ट्र जुगार कायदा कलमाद्वारे गुन्हा नोंद केला आहे.