शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

जयसिंगपुरात कचरा प्रकल्पासाठी जागेचा शोध

By admin | Updated: March 19, 2017 23:43 IST

पालिकेला हवी पाच एकर जमीन : कचरा प्रश्न ऐरणीवर येणार

संदीप बावचे -- जयसिंगपूर शहरातील कचरा टाकणे आणि त्याची विल्हेवाट करणे हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येत आहे. सध्या ज्या खासगी ठिकाणी खासगी विहिरीत कचरा टाकण्यात येतो, ती विहीर भरत आली आहे. त्यामुळे येणाऱ्या १५ दिवसांत कचरा टाकण्याचा प्रश्न पुढे येणार आहे. पोलिस बंदोबस्तात कचरा टाकण्याची भूमिका पालिका प्रशासनाने घेतल्यानंतर त्यावर चिपरी ग्रामस्थांतून पडसाद उमटले होते. कचरा टाकल्यास व्यापक आंदोलन करण्याचा इशारा चिपरी ग्रामस्थांनी दिला होता. या सर्व अडचणींमुळे पालिकेने पुढाकार घेत कचरा प्रकल्पासाठी जागेचा शोध सुरू केला आहे. १ जानेवारी २०१७ पासून चिपरी हद्दीतील खाणीत कचरा टाकण्यास विरोध झाल्याने गेल्या तीन महिन्यांपासून खामकर मळ्यातील जुन्या विहिरीत कचरा टाकला जात आहे. तात्पुरता पर्याय पालिकेने शोधला आहे. सध्या कचरा टाकण्यात येत असलेली विहीर भरत आली आहे. येत्या १५ दिवसांत कचरा टाकण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येणार आहे. त्यामुळे पालिकेला कचरा टाकण्यासाठी पुन्हा जागा शोधावी लागणार आहे. कचरा टाकण्यासाठी जागा नसल्याने चिपरी गावच्या हद्दीतही कचरा टाकण्यास विरोध झाल्याने सध्या न्यायालयीन वाद सुरू आहे. त्यातच जयसिंगपूर नगरपालिका प्रशासनाने पोलिस बंदोबस्तात कचरा टाकण्याची भुमिका घेतल्यानंतर चिपरी ग्रामस्थांमध्ये संतप्त भावना उमटल्या होत्या. पोलिस बंदोबस्तात पुन्हा कचरा टाकण्याचा प्रयत्न झाल्यास जनआंदोलन उभारू, अशी भूमिका चिपरी ग्रामस्थांनी जाहीर केली होती. एकूणच शहरातील कचरा टाकण्याचा प्रश्न सध्यातरी गंभीर आहे. जमिनीचा शोधनुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या अर्थसंकल्पात कचरा डेपोच्या भूसंपादनासाठी पाच कोटी, तर घनकचरा प्रकल्प राबविण्याच्या दृष्टिकोनातून चार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शहरात दररोज निर्माण होणारा ओला व सुका कचरा प्रक्रिया करणे. त्याचबरोबर सपाटीकरण जमिनीसाठी शहरापासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या जमिनीचा शोध सुरू केला आहे. त्यासाठी पालिकेने अशी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांनी अथवा मिळकतधारकांनी कागदपत्रांसह पालिकेशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. ओल्या व सुका कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी सपाटीकरण जमिनीची गरज आहे. त्यामुळे अशी जमीन पालिकेकडून शोधली जात आहे. डोंगराळ, खडकाची, खारफुटीची असणारी जमीन या प्रकल्पासाठी गरजेची आहे. किमान २० ते २५ वर्षांपर्यंत प्रक्रिया करणे व भूभरावासाठी उपयोगात असणारी जमीन असणे गरजेची आहे.- हेमंत निकम, मुख्याधिकारी जयसिंगपूर